Vote Theft : काँग्रेस कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या

Demand to withdraw false cases against Congress workers : भाजपच्या विरोधात आंदोलन, राहुल बोंद्रेंवरही गुन्हा

Malkapur चिखली येथे ३१ ऑगस्ट रोजी “मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी” या मॅरेथॉन स्पर्धेनंतर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह १३ कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा निषेध नोंदवित हे खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन राष्ट्रपतींकडे उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्यामार्फत पाठविण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी “मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी” ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या; मात्र चिखली येथे झालेल्या मॅरेथॉननंतर स्थानिक आमदार व भाजपा सरकारच्या दबावाखाली पोलिस प्रशासनाने बोंद्रे व इतर पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले.

Load Shedding : लोडशेडिंगच्या विरोधात नागरिकांचे अंधारात आंदोलन!

या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, प्रशासनाने पक्षीय दबावाला बळी पडण्याऐवजी निष्पक्ष भूमिका घ्यावी. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत.

Local Body Election : महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष; ओबीसी, एससी, एसटी आरक्षणानंतर बदलणार समीकरण

या निवेदनावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी रशीदखा जमादार, माजी आमदारांचे सहकारी शेलकर, सोपानराव, सौ. मंगलाताई पाटील, युसूफ खान, डॉ. सय्यद सलीम कुरेशी, प्रमोददादा अवसरमोल, शहर अध्यक्ष हाजी रईसखा जमादार, तालुका अध्यक्ष अनिल भारंबे, अॅड. जावेद कुरेशी, बंडूभाऊ चौधरी, अनिल गांधी, सौ. प्रीती भगत, ज्ञानदेव तायडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.