Vanchit Bahujan Aghadi attacks Congress : मतचोरीच्या प्रकरणात आघाडीचा काँग्रेसवर हल्लाबोल
Akola देशात आणि राज्यात निवडणूक आयोग व भाजप यांचे संगनमत असून मोठ्या प्रमाणात मतचोरी (वोट घोटाळा) झाल्याचा गंभीर आरोप इंडियन नॅशनल काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचा आरोप आहे की या मतचोरीमुळे भाजप आणि महायुती सत्तेत आली आहे. असे असेल तर मग आम्ही भाजपची बी टीम कसे या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसने द्यावे असे आवाहन वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक कोटी रहस्यमय मतदार असल्याचा दावा करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. मात्र, गंभीर आरोप करूनही काँग्रेसने अद्याप न्यायालयात जाण्याचे टाळले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने आंदोलनात्मक मोहीम हाती घेतली असून, राज्याध्यक्ष हर्षवर्धन सपकळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ईसीआयकडे निवेदन दिले. यात डिजिटल मतदारयादी आणि मतदानाच्या व्हिडिओ फुटेजची मागणी करण्यात आली आहे.
Ladki Bahin Scheme : एका रेशनकार्डवर एकीलाच लाभ; नणंद-भावजय, सासू-सूनेत पेटले वाद!
काँग्रेसने मतदान प्रक्रियेत शेवटच्या टप्प्यात झालेल्या असामान्य वाढीवर प्रश्न उपस्थित केले आणि न्यायालयात जाण्याची तयारी दाखवली. तरीदेखील काँग्रेसने याचिका दाखल केलेली नाही. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी देखील एका चर्चेत, “निवडणूक जिंकण्यासाठी दोन लोक भेटले आणि मॅनेज करण्याची ऑफर दिली होती,” असा दावा केला. मात्र, त्या व्यक्तींची नावे उघड केली नाहीत.
Project affected farmers : जिगावनंतर आता उतावळी प्रकल्पग्रस्त आक्रमक!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी काँग्रेसच्या आरोपांना दुजोरा दिला. ते म्हणाले, “जर निवडणुका प्रामाणिक झाल्या असत्या, तर मविआ (शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी) विजयी झाली असती. भाजप सत्तेवर येऊ शकली नसती.” त्यांनी कार्यकर्त्यांना मतदारयादीतील चुकीच्या नोंदीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले.
Amit Shah : सत्य-असत्याची व्याख्या विरोधकांच्या म्हणण्यावर ठरत नाही !
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी देखील, “गेल्या दहा वर्षांपासून मतचोरी सुरूच आहे,” असा आरोप केला आणि ईसीआयने या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर पलटवार करताना म्हटले, “काँग्रेस स्वतः मतचोरी करते. प्रितीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील काही लोक अनेक ठिकाणी मतदान करत होते,” असा आरोप त्यांनी केला.