NCP leader Anil Deshmukh said that Congress leader Rahul Gandhi wrote a relevant article : राहुल गांधींनी मुद्देसुद लेख लिहीला
Nagpur : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज मागवले. पूर्वी असे फुटेज देण्याची व्यवस्था होती. पण आता नियमांतून ही बाब काढून टाकण्यात आली त्यामुळे यादीसुद्धा मिळत नाही. त्यामुळे ईव्हीएममध्ये नक्कीच गडबड आहे, याची पुष्टी होते, असे राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, राहुल गांधी यांनी लेख लिहून योग्य प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक प्रक्रियेत सरन्यायाधीशांना बाजुला का केलं, याचंही उत्तर अद्याप मिळालेलं नाही. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मागील पाच वर्षांत जेवढे मतदार आले नाहीत, तेवढे पाच महिन्यांत आले. ही यादी फुगवण्यात आली आणि नेमका त्याचाच फायदा मतदानात घेण्यात आला.
मुंबईतील लोकल दुर्घटनेबाबत विचारले असता, लोकलने दररोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. घडलेली घटना दुःखद आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. खिडकीला लटकून प्रवासी जात असतील, तर त्याला मनाई केली पाहिजे. मुंबई लोकलमध्ये वारंवार अपघात होतात. पण लोकांचाही नाईलाज आहे. कारण मुंबईच्या लोकांचं जीवनच लोकलवर अवलंबून आहे. लोकसंख्येत वाढ झाली. पण लोकलच्या संख्येत तुलनेने वाढ झालेली नाही. त्यामुळे लोकलची संख्या वाढवली पाहिजे. रेल्वे खात्याने याकडे लक्ष दिले पाहिजे, असे देशमुख म्हणाले.
Supriya Sule On Ajit Pawar : दादासोबत जाण्यास ताई तयार! सुप्रिया सुळेंचे संकेत
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच चांगले परिणाम होतील. शरद पवार आणि अजित पवार अनेक संस्थांवर आहेत. त्यामुळे बैठकांच्या निमित्ताने ते एकत्र येत असतात. याचे राजकीय अर्थ काढणे योग्य नाही, असेही अनिल देशमुख यांनी नमूद केले.