Voters Number : दीड तासांच्या भाषणात मोदींनी शब्दही काढला नाही !

Congress state president Harshvardhan Sapkal said that PM Narendra Modi did not said a single word : गोडबंगाल नाही, तर माहिती का लपवली जात आहे?

Mumbai : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी २०२४ च्या निवडणुकीत मतदानात झालेल्या घोटाळ्याचा प्रश्न आकडेवारीसह मांडला आहे. हा केवळ आरोप नाही, तर आकडेवारीसह त्याची मांडणी केली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दीड तास बोलले. पण या दीर्घ भाषणात त्यांनी या घोटाळ्यावर चकार शब्दही काढला नाही. लोकशाही व्यवस्थेवर निर्माण झालेला हा गंभीर व चिंताजनक मुद्दा आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात झालेल्या मतांच्या चोरीमुळे निवडणूक आयोगाची विश्वासाहर्ता पणाला लागली आहे. चक्क लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रदेश काँग्रेस १२ जूनला राज्यभर मशाल मोर्चे काढणार आहे. गडचिरोली येथील मोर्चात आपण स्वतः सहभागी होणार आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Voters Number : भाजपने पाच महिन्यांत ४१ लाख मतदार वाढवले कसे ?

काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने हा मुद्दा सविस्तरपणे निवडणूक आयोगाकडे मांडला. यामध्ये आयोगाने खुलासा करून वस्तुस्थिती मांडणे अपेक्षीत होते. पण त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर चक्क नियमांत बदल करून व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेज, माहिती देता येणार नाही, असा फतवाच काढण्यात आला. हा लोकशाहीवरचा घाला आहे. यामध्ये काही गौडबंगाल नाही, तर मग माहिती का लपवली जात आहे, हा प्रश्न उपस्थित होतो.

Rahul Gandhi : महाराष्ट्र विधानसभेत ‘मॅच फिक्सिंग’ सारखी हेराफेरी : राहुल गांधी

२०२४ मध्ये महाराष्ट्रात मतांची चोरी करून भाजप महायुती सरकार सत्तेत आले आहे. अचानक वाढलेले हे मतदान बोगस आहे. काँग्रेसने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. पण चौकशी केली जात नाहीये. आमचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत आणि बाहेरही हा प्रश्न लाऊन धरला. तरीही चौकशी झाली नाही. अन् आज देशातील प्रमुख वर्तमानपत्रांत या विषयावर लेख प्रकाशित झाल्यानंतर राजकीय भुकंप झाला. निवडणूक फिक्सींगच्या चौकशीची मागणी होत आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.