Breaking

Waqf Amendment Bill : अकोल्यात मुस्लिम समाजाचे शांततापूर्ण आंदोलन!

 

Peaceful protest by the Muslim community in Akola : काळ्या पट्ट्या बांधून वक्फ सुधारणा विधेयकाला नोंदवला विरोध

Akola वक्फ सुधार विधेयक 2025 च्या विरोधात अकोला शहरात मुस्लिम समाजाने शांततापूर्ण आंदोलन करत निषेध नोंदवला. जुम्माच्या नमाजदरम्यान काळी पट्टी बांधून मुस्लिम समाजाने आपला विरोध दर्शवला. शहरातील प्रमुख मशिदींमध्ये या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला.

मोमिनपुरा मशिदीत मुफ्ती अशफाक कासमी यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध व्यक्त करण्यात आला. तर कच्छी मस्जिदसह इतर मशिदींमध्ये वेगवेगळ्या उलेमांच्या मार्गदर्शनाखाली नमाजींनी काळी पट्टी बांधून विधेयकाचा विरोध केला. कच्छी मस्जिदमध्ये झालेल्या आंदोलनात अध्यक्ष जावेद जकरिया, हनीफ मलक, समीर भुरानी, वाहिद मुसानी, साकिब मेमन, जावेद खान, तनवीर खान, कासम खान, मौलाना शम्स तबरेज, शाहिद खान, सफदर अली यांसह अनेक उल्मा, समाजसेवक आणि मान्यवर उपस्थित होते.

Bhandara Municipal Council : कर वसुली पथकाने चार दुकाने सील केली

वक्फ सुधार विधेयक 2025 मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक हक्कांवर गदा आणणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांवर आणि संस्थांवर सरकारचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

जर हे विधेयक लागू झाले, तर मशिदी, ईदगाह, मदरसे, दरगाह, खानकाह, कब्रस्तान आणि इतर धर्मार्थ संस्थांच्या मालकीच्या जमिनींवर सरकारचा ताबा जाऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण देशभरातून मुस्लिम समाजाकडून या विधेयकाचा विरोध केला जात आहे.

Bhandara Police : देशी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूसे जप्त

सामाजिक कार्यकर्ते जावेद जकरिया यांनी सांगितले, “हे विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक संपत्तीच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करू शकते. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याला विरोध होत आहे. सरकारने हे विधेयक तात्काळ मागे घ्यावे.”

नमाजींनी शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत सरकारला आवाहन केले की, हे विधेयक त्वरित मागे घेतले जावे आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक अधिकारांचे संरक्षण केले जावे.