Historic decision of State Minority Commission Chairman Pyare Khan : राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा ऐतिहासिक निर्णय
Nagpur : वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून बरेचदा वादविवाद झालेले पहायला मिळाले. या मुद्यावरून राजकारणही झाले. वक्फ बोर्डाच्या अनेक जागा वादात सापडल्या. पण राज्य अल्पसंख्याक आयोगाने विवादात अडकलेली एक-एक जागा मोकळी करण्याचा निर्णय आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या पुढाकाराने घेतला आहे.
देशात प्रथमच वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य अल्पसंख्याक आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील ३०० लोकांना घराच्या मालकी हक्काचे पट्टे आणि घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. सोबत वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखालील १०० एकर जमिनीवर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटल उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
Sudhir Mungantiwar : स्वातंत्र्य दिन सोहळ्यात लोकतंत्र सेनानींना सन्मानपूर्वक निमंत्रण द्यावे
नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये बोहरा मुस्लीम समाजाच्या संस्थेची मेहंदी बाग सोसायटीत १०० एकर जमिन आहे. या जमिनीवर गेल्या ७० वर्षांपासून वाद सुरू होता. तो सोडवण्यात बऱ्यापैकी यश आलेले आहे. देशभरात मुस्लीम समाजाच्या संस्थांच्या साडेनऊ लाख एकर जमिनी वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहेत. यापैकी महाराष्ट्रात सुमारे ९० हजार एकर जमिन आहे. त्यांतील १० टक्के जमीन शहरी भागात आहे. या जमिनींचा सदुपयोग समाजासाठी करण्याचा निर्णय राज्य अल्पसंख्याक आयोगाने घेतला असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar : लोकतंत्र सेनानींनी गाठले चंद्रपूर अन् दिले मुनगंटीवारांना आशीर्वाद !
वक्फ बोर्ड ही एक कायदेशीर संस्था आहे. ही संस्था भारतातील इस्लामिक कायद्यानुसार धार्मिक धर्मादाय कार्यासाठी असलेल्या मालमत्तेचे व्यवस्थाप करते. वक्फ बोर्ड, वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन आणि वापर ही संस्था ठरवते. समुदायाच्या कल्याणासाठी ही संस्था बोर्डाच्या मालमत्तेचा गैरवापर, अवैध विक्री थांबवण्यासाठीही काम करते. या बोर्डाच्या अनेक जमिनींवर वाद सुरू आहेत. हे वाद मिटवण्यासाठी आता राज्य अल्पसंख्याक आयोगाने पुढाकार घेतला आहे.