Breaking

Ward structure in final stage : अमरावती जिल्हा परिषदेसाठी ५९ जागांवरच निवडणूक

Elections for Amravati Zilla Parishad on only 59 seats : प्रभाग रचना अंतिम टप्प्यात; १८ ऑगस्टला अंतिम अधिसूचना जाहीर होणार

Amravati सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषद निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार घेण्याचे स्पष्ट केले असले, तरी ती रचना नोव्हेंबर २०२१ पूर्वीची असल्याचा दावा निवडणूक विभागाने केल्याने, अमरावती जिल्ह्यात ६६ ऐवजी ५९ जागांसाठीच निवडणूक होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

२०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी जिल्हा परिषदेतील मतदारसंघांची संख्या ५९ होती. २०२२ मध्ये लोकसंख्या वाढीचा निकष लावत ही संख्या ६६ वर नेण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील “नवी रचना” ही २०२१ पूर्वीचीच मान्य करण्यात आल्याने, आगामी निवडणूक ५९ मतदारसंघांपुरतीच मर्यादित राहील. यामध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण राहील, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाने स्पष्ट केले.

BARTI : अमरावतीत लवकरच होणार ‘बार्टी’चे उपकेंद्र

दरम्यान, गट व गण रचनेबाबत दाखल आक्षेप व सूचनांवर बुधवार, ६ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रभाग रचनेबाबत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी आपली बाजू सविस्तरपणे मांडली. याशिवाय इतरही गटांवरील आक्षेपांवर संबंधितांकडून विचारविनिमय करण्यात आला.

Akola Municipal Corporation : टीडीआर घोटाळ्याचा आरोप; डीपी प्लॅनच्या आडून कोट्यवधींचा गैरव्यवहार उघड

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर मागील पंधरवड्यात हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यावर ६ ऑगस्टला झालेल्या सुनावणीनंतर विभागीय आयुक्त अंतिम अहवाल ११ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे सुपूर्द करतील. त्यानंतर १८ ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या अंतिम प्रभाग रचनेची अधिकृत घोषणा होणार आहे.