Breaking

Wardha Collector : संभाव्य पाणीटंचाई कृती आरखाडा तयार!

Water scarcity action plan prepared : १९.७६ कोटींची तरतूद; ५०१ गावे, ८ तालुक्यांचा समावेश

Wardha यावर्षी जवळपास ५०१ गावे पांणीटंचाईच्या छायेत आहेत. ८ तालुक्यांतून टंचाई निवारणार्थ उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषेदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाईचा १९ कोटी ७६ लाख ३२ हजार रुपायांचा आराखडा तयार केला आहे. सदर आराखडा मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या आराखड्यावर जिल्हाधिकारी यांनी शिक्कामोर्बत केले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे कामे करण्याचा आता मार्ग मोकळा झाला आहे.

प्रतिवर्ष जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पाणीटंचाईवर उपययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या रिपोर्टवर संभाव्य पाणीटंचाईचा आरखडा तयार केला जातो. पहिला टप्पा १ अक्टोबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत आहे. यामध्ये ३ गावांत ३ उपययोजना आहेत. दुसरा टप्पा १ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे.

Prakash Ambedkar on Pune Swargate Rape Case : योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

त्यामध्ये २३९ गावांत ४४९ संवाव्य उपाययोजना करायच्या आहेत. तर, तिसरा टप्पा १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ पर्यंत आहे. यामध्ये २६० गावांत ४१३ संभाव्य उपाययोजना करायच्या आहेत. पहिल्या ते तिसऱ्या टप्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात १७३ गावांत २३९ नवीन बोअर घेण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात १३८ गावांत १४६ नळाद्वारे पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येणार आहेत, तर तिसऱ्या टप्प्यात १२५ गावांत १२८ नळदुरुस्तीचे कामे, असे एकूण २६३ गावांत २७४ नळदुरुस्तीचे कामे करण्यात येणार आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील पाणीटंचाईवर उपयायोजना करण्यासाठी जिल्ह्यातील १८५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहेत.

Crime in Akola : Cryptocurrency च्या नावाने तब्बल साडेचार कोटींची फसवणूक!

जिल्ह्यातील १०२ गावांत पाणीटंचाईवर मात देण्यासाठी १४१ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करण्यात येणार आहेत. संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ कृती आरखडानुसार जिल्ह्यातील ७ गावांत टॅंकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, बोअर दुरुस्ती, नळ दुरुस्ती, पाइप लाइन दुरुस्ती, अशा विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.