Breaking

Wardha health : वर्धा जिल्ह्यात GBS ची Entry !

GBS virus entered Wardha : वयोवृद्धाला लागण; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

Wardha जीबीएस हा एक न्यूरोलॉजिकल आजार असून या आजाराचा शिरकाव जिल्ह्यात झाला. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. आष्टी तालुक्यातील रहिवासी ८५ वर्षीय वयोवृद्ध रुग्ण आढळून आला.

रुग्णावर नागपुरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. ‘जीबीएस’ हा आजार दुर्मीळ असून त्याचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे. कोरोना पाठोपाठ आता ‘गुइलेन बॅरे सिंड्राेम’ या दुर्मीळ आजाराचा वर्धा जिल्ह्यात शिरकाव झाला आहे. आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली असून त्यांच्याकडून उपाययोजना करण्यात येत आहे.

Irrigation department : तापी मेगा रिचार्ज प्रकल्प रखडला; निधीअभावी विकासावर ब्रेक

जीबीएस ही एक दुर्मीळ परंतु, उपचार करण्यायोग्य न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. ज्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मज्जातंतूंवर हल्ला होतो. ज्यामुळे मान, चेहरा आणि डोळ्यांमध्ये अशक्तपणा येणे, मुंग्या येणे किंवा सुन्न होणे, गंभीर प्रकरणांमध्ये चालायला त्रास होणे, अन्न पदार्थ गिळता न येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणे प्रामुख्याने जीबीएसमध्ये दिसतात.

जीबीएस या आजारामध्ये दोन्ही हात-पायाचे स्नायू कमकुवत होतात. याची सुरुवात पायापासून होते. रुग्णाला बसण्यास व उठण्यास त्रास होतो. श्वास घेण्यास त्रास होतो. काही रुग्णांमध्ये चालताना किंवा उभे राहताना तोल जातो. डोळ्याचे स्नायू कमकुवत होऊन दृष्टी कमी होते. काही रुग्णांमध्ये गिळायला त्रास होतो.

जीबीएस हा ‘न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर’ असलेला आजार सामान्यत: न शिजवलेल्या अन्नामध्ये आढळणाऱ्या कॅम्पिलोबॅक्टर या जीवाणूमुळे होणाऱ्या संक्रमणामुळे होतो. मात्र हे एक कारण आहे. त्यामुळे न शिजवलेले अन्न खाऊ नये. काही खाण्यापूर्वी हात चांगले धुतल्यास हा आजार टाळण्यास मदत होऊ शकते. पाणी उकळून थंड करून प्यायला हवे.

MLA Randhir Sawarkar : होमिओपॅथी डॉक्टरांना करायचाय ऍलोपॅथिक उपचार !

इन्फ्लुएंझा व्हायरससारखे इतर व्हायरस म्हणजे झिका व्हायरस, हिपॅटायटीस व्हायरस आणि एचआयव्हीमुळे असामान्य रोगप्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे हा आजार होऊ शकतो, असे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील १२३ सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांचे शिबिर २४ रोजी पार पडले. शिबिरात आवश्यक त्या सूचना देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या. यवतमाळ येथील रहिवासी ३५ वर्षीय व्यक्तीला गुइलेन-बॅरे सिंड्रोम आजार आढळून आला. त्याला सावंगी येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.