Breaking

Wardha Mahavitaran : ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्यांना मिळणार स्मार्ट फोन !

 

Those who pay electricity bills online will get smart phones : महावितरणची डिजिटल ग्राहक योजना, लकी ड्रॉ ७ एप्रिलला,

Wardha : महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा पहिला लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीने ७ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक याप्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता ६५१ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षीस म्हणून दिला जाणार आहे. तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन प्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी १,३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन व प्रत्येकी दोन प्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी १,३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

पुढील लकी ड्रॉ मे व जून महिन्यात काढण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. महावितरणने ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन व तीन पेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.

Wardha Mahavitaran : महावितरणचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांना होतोय त्रास!

ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (एल टी- लाईव्ह) वीज ग्राहकांसाठी लागू असून, ज्यांनी १ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्षाच्या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाइन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. अशांनी अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पद्धतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत.

Wardha Mahavitaran : ३ हजार २०१ वीज ग्राहक पर्यावरणस्नेही

ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाइल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रकमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. ७० टक्क्यांहून अधिक वीज ग्राहक ऑनलाइन पद्धतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.

Mahavitaran : फेब्रुवारीचे वीज बील देणार शॉक ?

डिजिटल वीज बिल भरताना सूट दिली जात आहे. ७० टक्क्यांहून अधिक वीज ग्राहक ऑनलाइन पद्धतीने वीज बिलाचा भरणा करत आहेत. योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस आदी ऑनलाइन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एक प्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील.