Control of Wardha MIDC transferred to Nagpur : चंद्रपूर होते गैरसोयीचे; विकासातील अडसर दूर होईल
Wardha एमआयडीसीच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून वर्धा जिल्ह्याचे नागपूर प्रादेशिक कार्यालयातून चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयात स्थलांतर करण्यात आले होते. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील उद्योग विकासासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता वर्धा एमआयडीसीची सूत्रे नागपूरला हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यामुळे विकासातील अडसर दूर होण्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
भौगोलिक दृष्टिकोनातून चंद्रपूर हे वर्धा जिल्ह्यासाठी गैरसोयीचे ठरते. त्यामुळे वर्धा, कारंजा आणि आर्वी येथील एमआयडीसीच्या पुढील विकासावर परिणाम होण्याची शक्यता होती. याची दखल घेऊन आमदार सुमित वानखेडे MLA Sumit Wankhede यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांची भेट घेतली. तसेच हिवाळी अधिवेशनातूनही याकडे लक्ष वेधले होते.
MLA Manoj Kayande : चोखामेळांच्या जन्मोत्सवात रंगला राजकीय आखाडा !
आर्वी मतदारसंघातील शेवटच्या टोकावरील छोट्या उद्योजकाला चंद्रपूर येथे जाऊन उद्योगाविषयी कामकाज करणे परवडणारे नाही. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली. उद्योग मंत्रालयाशीही सातत्याने संवाद साधून चूक सुधारण्याचा आग्रह धरला होता. परिणामी वर्धा जिल्हा पुन्हा एकदा नागपूर प्रादेशिक कार्यालयाशी जोडण्यात आला आहे.
वर्धा जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी नागपूर प्रादेशिक कार्यालयाशी जोडलेला पूर्वीचा निर्णय कायम ठेवण्याची विनंती केली. त्या मागणीला यश आले आहे. वर्धा एमआयडीसीचे कार्यालय नागपूर प्रादेशिक कार्यालयासोबत संलग्न राहणार असल्याचा शासनाने आदेश काढला आहे. त्यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
MLA Shweta Mahale : सिंचन विहीर वाटपात गैरप्रकार; आमदार ॲक्शन माेडवर !
वर्धेचे आमदार सरसावले
वर्धा एमआयडीसीचे कार्यालय चंद्रपूरशी जोडल्यानंतर काही उद्योजकांसह वर्धा नगरपालिकेचे माजी सभापती निलेश किटे यांनी डॉ. पंकज भोयर MLA Pankaj Bhoyar यांची भेट घेतली. गांभीर्य लक्षात आणून दिले. डॉ. भोयर यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही बाब लक्षात आणून दिली. वर्धा कार्यालय नागपूरसोबतच संलग्न करण्याची विनंती केली होती.