The municipality has not paid the water tax : ५.७३ कोटी रुपये थकित; पाटबंधारे विभाग action mode वर
Wardha शहराला धाम धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी वर्धा पालिकेला पाटबंधारे विभागाकडून नाममात्र शुल्कात पाणी उपलब्ध करून दिले जाते. असे असताना गत तीन वर्षांपासून पालिकेने पाटबंधारे विभागाला पाण्याचा करच अदा केला नाही. पाण्याच्या कराची ही रक्कम तब्बल ५ कोटी ७३ लाख रुपयांवर पोहोचली आहे.
थकीत रकमेचा वाढता आकडा लक्षात घेता पाटबंधारे विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. पालिकेची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यातील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पाटबंधारे विभागाने तलाव, धरणाची निर्मिती केली.
Nagpur Improvement Trust : एनआयटी बरखास्तीसाठी भाजप-काँग्रेस एकत्र!
यातून मोठ्या शहरासह ग्रामपंचायत तसेच जिल्ह्यातील उद्योग कारखाने मोठे प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. मात्र, असे असताना एकट्या वर्धा नगर पालिकेकडे गत तीन वर्षांपासून कराचा भरणा केला नाही. शिवाय लघु उद्योगांसह, मोठ्या उद्योगांकडे लाखांची थकबाकी असल्याने जिल्ह्यातील आस्थापनांकडे थकबाकी असलेला आकडा २५ कोटी ३७ लाख ४० हजार रुपये एवढा आहे.
या थकबाकीमुळे कालवे दुरुस्तीसह अन्य कामे रखडली असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाकडे ८ मोठे, तर २० लहान जलाशय आहेत. यातून जिल्ह्यासह चंद्रपूर तालुक्यातील काही भागांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पोथरा प्रकल्पामधून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा येथील बिल्ट ग्राफीक पेपर मिल व राजुरा नगरपरिषदेला पाणी पाणीपुरवठा केला जातो.
मदन प्रकल्पामधून जामणी येथील मानस ॲग्रो अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सदर कंपनीने जीवन प्राधिकरणाचे ३१ जानेवारी २०२५ पर्यंत १७ कोटी ६६ लाख ९९ हजार रुपये थकविले आहेत.
पिंपरी मेघे व १३ गावे पाणीपुरवठा योजनांतर्गत धाम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वर्धा, व्यवस्थापन मध्य रेल्वे वर्धा, उत्तम व्हॅलू स्टील लिमिटेड, वर्धा, नगरपरिषद वर्धा, ग्रामपंचायत पवणार, ग्रामपंचायत आंजी, बोर अभयारण्यातील हॉटेल अरण्यक, विश्रामगृह बोर धरण, मत्स्य बीज केंद्र व एवोनिथ मेटॅलिक्स वर्धा यांना जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणीपुरवठा केला जातो.