Action taken by Wardha Traffic Police Department
Wardha : वाहतुकीला शिस्त लागावी व अपघाताच्या घटना टाळता याव्या. वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र तरीदेखील अनेक वाहनधारक घाई करीत वाहतूक नियम मोडत असल्याचे प्रकार घडत असतात. सन २०२४ या वर्षात वाहतूक नियम मोडणाऱ्या ८९ हजार ७३० जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना ८ कोटी २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, नो पार्किंग, नो हेल्मेट, सिग्नल तोडणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, अल्पवयीन असतानाही वाहन चालवणे, रहदारीस अडथळा निर्माण करणे, दुचाकीवर तीन सीट, वाहनांच्या काचेवर काळी फिल्म लावणे, फॅन्सी नंबर प्लेट, वैध लायसन्सशिवाय वाहन चालविणे, धोकादायक वाहन चालविणे, अवैध प्रवासी वाहतूक आदी कारणास्तव वाहनचालकांवर दंड ठोठावण्यात आला आहे.
YDCC बँकेत काँग्रेसकडून काँग्रेस अध्यक्षांना होणाऱ्या विरोधाचा अर्थ काय ?
जानेवारी ते डिसेंबर २०२४ या १२ महिन्यांदरम्यान वाहतूक नियम मोडणाऱ्या वेगवेगळ्या वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. तरी वाहनधारक नियम मोडत असल्याचे दरवर्षी दिसून येते. २०२४ मध्येदेखील वाहनधारकांनी नियम मोडले व त्यांना आठ कोटींपेक्षा अधिक दंड करण्यात आला.
Cyber crime : एम्सच्या डॉक्टरने link वर click केले, लाखो रुपये गायब!
१२ महिन्यांत ८९ हजार जणांवर वाहतूक नियम मोडल्याची कारवाई झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या वर्षात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन हजार लोकांवप वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतूक व ड्रंक ॲन्ड ड्राइव्ह या अंतर्गत लाखोंचा दंड ठोठावला आहे.
वाहनधारकांनी नियमांचे पालन करून शिस्त पाळण्याची गरज आहे. बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणारच आहे. ही मोहीम सतत सुरू राहणार आहे, असे पोलिसांनी सांगितले