Wardha Police : पोलिसांचे ‘खबरी’ गेले कुठे?

 

No one is ready to be Khabari of police : तपासात येतोय अडथळा; जबाबदारी घेण्यात कुणालाच रस नाही

Wardha सराईत गुन्हेगारांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविण्याचे काम खबऱ्यांकडून केले जात होते. आता खबऱ्यांचे काम करणारे कमी झाल्याने गुन्ह्यांच्या तपासात अडथळे येत आहेत. खबऱ्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त झाले आहे.

अमली पदार्थांच्या तस्करीला चाप लावण्यासाठी जिल्ह्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. पोलिसांनी गस्त वाढवावी, अमली पदार्थ तस्करांची माहिती देणाऱ्याला सुरक्षा द्यावी, खबऱ्यांचे नेटवर्क भक्कम करण्याच्या सूचना देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहे. आधी पोलिसांचा खबऱ्या असणं मानाचं मानलं जात होत. त्याचा समाजात दरारा होता. परंतु, कालांतराने खबऱ्यांवर हल्ले होऊ लागले.

त्यातून पोलिसांना माहिती देण्याचे काम जोखमीचे झाले. यापूर्वी खबऱ्यांना रोख रुपये दिले, तरी ते खूष होत असे. परंतु, आता त्यांचाही रेट वाढला असून, गोपनीय माहिती देण्यासाठी दहा हजार रुपये मागितले जात असल्याचे सांगण्यात येते.

Pulgao Police : खवले मांजरचे दोन कोटींचे Deal उधळून लावले!

सध्या जिल्ह्यात खून, घरफोडी, चोरी यासह अमली पदार्थाच्या तस्करीत वाढ झाली. गांजा, गोळ्यांसह एमडी, कोकेन आदी अमली पदार्थही सहज उपलब्ध होत आहे. नशेचा बाजार मांडलेल्यांना चाप लावण्यासाठी पोलिसांना खबऱ्यांचे नेटवर्क पुन्हा जागृत करावे लागणार आहे. पोलिसांना गोपनीय माहिती देण्यासाठी आता वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार करता येते.

ओळख द्यायची नसेल किंवा गोपनीय ठेवली जाते. गुन्हा पाहिला असल्यास किंवा तो छायाचित्रित केल्यास हरवलेली व्यक्ती, अनोळखी मृतदेह, चोरीचे किंवा सापडलेले वाहन, नोंदणीकृत एफआयआर, अपघात, पाहिजे असलेले गुन्हेगार आदींविषयी थेट कॉल करूनही पोलिस ठाण्याला सांगता येते. पोलिस विभागातील विशेष शाखा ही महत्त्वाची भूमिका बजावते. दहा वर्षांपूर्वी खबऱ्यांचे नेटवर्क भक्कम होते. त्यावेळी गुन्हेगारी टोळ्या कार्यरत होत्या.

Crime in Wardha : रशियातील विद्यापीठात प्रवेश करून देतो म्हणून उकळले पैसे!

खुनाची घटना घडल्यास संशयितांची माहिती काढण्यासाठीही खबऱ्यांचा वापर केला जात होता. जातीय, धार्मिक तणाव, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात खबऱ्यांची मदत होत होती. परंतु, आता काळ बदलला. तांत्रिक माहितीच्या आधारावर गुन्ह्यांची उकल केली जाते. गुन्हेगारांचे लोकेशन काढून त्यांच्या मुसक्या आवळल्या जातात. त्यामुळे खबऱ्यांचे महत्त्व कमी झाले.