The contractors protested against the executive engineer : पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात कंत्राटदारांचे ठिय्या आंदोलन
Wardha आर्वी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ई-निविदेत पात्र असलेल्या कंत्राटदारांना अपात्र ठरवले. मर्जीतील कंत्राटदाराला कामे मॅनेज करून देण्याची एकाधिकारशाही चालविली. त्यामुळे या कार्यपद्धतीचा सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदारांनी निषेध नोंदवला.
प्रहार सोशल फोरमचे संस्थापक बाळा जगताप यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये इंजिनियरिंग पदवीचे तोरण बांधून निषेध नोंदविला. तसेच, कार्यकारी अभियंता प्रशांत सोळंके यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Devendra Fadnavis Uday Samant : उद्योजकांनी ‘या’साठी मानले सरकारचे आभार!
आष्टी येथील टेकडीवाले बाबा दर्गाह दुरुस्तीच्या कामासाठी १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाची ऑनलाइन निविदा प्रकाशित करण्यात आली. यात तब्बल १३ कंत्राटदार सहभागी झाले होते. यात आर्वी, आष्टी, कारंजा यांसह जिल्ह्यातील कंत्राटदारांचा सहभाग होता. यातील १२ कंत्राटदारांना कोणतेही कारण न देता डावलून अमरावती जिल्ह्यातील एका कंत्राटदाराला काम मॅनेज करून देण्यात आले.
अन्यायग्रस्त कंत्राटदारांनी कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन आपली कैफीयत मांडली. पण, त्यांनी काहीही ऐकले नाही. त्यामुळे कंत्राटदारांनी बाळा जगताप यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक द्यायचे ठरले. कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारायचे ठरले. पण, अभियंत्यांनी दांडी मारल्याने संतप्त कंत्राटदारांनी त्यांच्या पदवींचे कार्यालयात तोरण बांधून निषेध नोंदविला. कार्यालयात ठिय्या आंदोलन करून उप कार्यकारी अभियंता लांजेवार यांना निवेदन दिले.
Farmer Unique ID : ज्याच्या नावावर जमीन; त्यालाच युनिक आयडी!
शासकीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता सोळंके यांच्या दालनाला ५० हजार रुपयांचे डिजिटल लॉक लावले आहे. तसेच, त्यांनी दोन वर्षांत सुशिक्षित बेरोजगारांना नियमानुसार कामे दिली नाहीत. त्यांची सभाही घेतली नाही. नियमानुसार दीड कोटीपर्यंतच्या कामासाठी स्वमालकीच्या हॉटमिक्सची व कोणत्याही साहित्याची अट नसतानाही tribal या निविदेंतर्गत ही अट टाकली. आणि इतर कंत्राटदारांना डावलण्यात आले, असा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप जगताप यांनी केला.
आर्वीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मनमर्जीने निविदा मॅनेज करून कामे दिली. यामुळे पात्र कंत्राटदार कामांपासून वंचित राहिले आहेत. तब्बल २०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आंदाेलनातून केला.
NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विसरायचेय अपयश!
सार्वजनिक बांधकाम विभागात कामे मॅनेज केली जात असल्याने यासंदर्भात आंदोलन करणार असल्याचा इशारा सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आला होता. त्यामुळे आज आंदोलनाच्या दिवशी कार्यकारी अभियंता कार्यालयात आलेच नाही. साहेब दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले, तसेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. हा अन्यायग्रस्तांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचेही कंत्राटदार म्हणाले.