The amount of nitrate found in the water : आरोग्य धोक्यात; गंभीर परिणामाची शक्यता
Wardha लहान मुले, गर्भवती महिला आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना नायट्रेटमुळे गंभीर धोका होण्याची शक्यता असते. याचा आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ५२० ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या ८८० गावांतील १ हजार १४४ जलस्रोतांपैकी १,३३० स्रोतांचे सॅम्पल घेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तपासणी अहवालात ४२ गावांतील ९५ स्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण आढळून आल्याची धक्कादायक बाब उजेडात आली.
शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या खतांमधले रासायनिक घटक मातीच्यामार्फत नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पाझरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भूगर्भातील जलसाठ्यांपैकी ७.१ टक्के जलसाठ्यांमध्ये ‘नायट्रेट’ आढळून आला आहे. पाणीपुरवठा विभागाने केलेल्या चाचण्यांमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Love story of teenager : पटना आयी नागपूर.. फिर भी न मिला सजना !
त्यामुळे येत्या काही वर्षांत जिल्ह्यातील नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित होऊन त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार वर्धा जिल्ह्यातील तब्बल ४२ गावांमध्ये ९५ स्रोतांतील पाणी पिण्यासाठी योग्य नाही. हे स्रोत लवकरात लवकर बंद करणे अथवा यात सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. ४२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात ४५ पीपीएमपेक्षा जास्त नायट्रेट आढळून आले आहे.
भूजल सर्वेक्षण आणि वर्धा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाणी गुणवत्तेची वेळोवेळी तपासणी केली जाते. जलस्रोतांमध्ये सुधारणा करणे ही तांत्रिक बाब देखील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करणे अपेक्षित असते. पण, मागील एका वर्षांत ४२ गावात नायट्रेटचे प्रमाण असताना यावर ठोस पावले उचलली गेली नाहीत. आता अहवाल समोर आल्यावर मात्र, पाणी पुरवठा विभागाकडून पुन्हा पाणी तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
२०२४-२५ या वर्षात मान्सूनपूर्व आणि मान्सून पश्चात पाणी नमुने प्रयोगशाळेतून तपासण्यात आले. यात सेलू तालुक्यातील ३५ स्रोतांमध्ये १७.२ टक्के आणि वर्धा तालुक्यातील ३५ स्रोतांमध्ये १६.९ टक्के म्हणजेच सर्वाधिक नायट्रेटचे प्रमाण आढळून आले. तसेच कारंजा आणि समुद्रपूर तालुक्यातील काही गावांमध्ये जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण आढळून आले आहे.