Breaking

Warning of Irrigation Department : प्रशासनाचा हलगर्जीपणा, नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट

 

Laxity of administration, crisis of water shortage on citizens : पाटबंधारे विभागाचा इशारा; १९ कोटी ६० लाखांची थकबाकी

Akola महापालिका, जिल्हा परिषद आणि सहा नगरपरिषदांकडे असलेल्या १९ कोटी ६० लाख २० हजार रुपयांच्या थकबाकीचा भरणा १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत न केल्यास पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा ठाम इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. या निर्णयामुळे अकोला शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

अकोला महापालिका, जिल्हा परिषद आणि मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, पातूर, शेगाव व जळगाव जामोद नगरपरिषदांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. अकोला महापालिका 2 कोटी 8 लाख 4 हजार रुपये, मूर्तिजापूर नगरपरिषद 3 कोटी 87 लाख रुपये, अकोला जिल्हा परिषद (60 खेडी) 3 कोटी 46 लाख 67 हजार रुपये, अकोला जिल्हा परिषद (4 खेडी योजना) 77 लाख 99 हजार रुपये, वान प्रकल्प (84 खेडी योजना) 5 कोटी 65 लाख 23 हजार रुपये, तेल्हारा नगरपरिषद 1 कोटी 29 लाख 62 हजार रुपये, अकोट नगरपरिषद 38 लाख 64 हजार रुपये, पातूर नगरपरिषदेवर 14 लाख 97 हजार रुपये थकबाकी आहे.

Nana Patole : भंडारा जिल्हा परिषदेत पटोले ठरले बाजीगर!

शेगाव नगरपरिषदेकडे ₹92 लाख 23 हजार, तर जळगाव जामोद नगरपरिषदेकडे ₹1 कोटी 85 लाख 94 हजार रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी वेळेत न भरल्यास या दोन्ही शहरांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

अकोला महापालिकेला काटेपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही 2 कोटी 8 लाख रुपयांची थकबाकी अद्याप भरलेली नाही. त्यामुळे ही थकबाकी तातडीने न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा थांबवला जाईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

Minister for Industries Uday Samant : ‘गडकरी साहेब, येवा कोकण आपलोच असा’

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण जिल्हा पाणीटंचाईच्या संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता संबंधित यंत्रणांकडून वेळीच थकबाकी भरली जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.