Breaking

Washim Guardian Minister : वाशिमचे पालकमंत्री बदलणार; नाईक यांच्या नावाची चर्चा!

Indranil Naik to replace Hasan Mushrif? : अंतर जास्त असल्याने हसन मुश्रीफ यांना जातेय अडचण

Washim वाशिमचे पालकमंत्री बदलण्याच्या चर्चेला वेग आला आहे. महायुतीतील अनेक मंत्र्यांना स्वजिल्ह्यात पालकमंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना वाशिमच्या पालकमंत्री पदावर काम करण्यास इच्छाही कमी असल्याची चर्चा आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील अंतर जास्त असल्याने वाशिमचे पालकमंत्री बदलण्याची शक्यता अधिक दिसत आहे. त्यामुळे, आता वाशिमचे पालकमंत्री कोण होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

राज्यातील पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर, प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणासाठी हसन मुश्रीफ २५ जानेवारीला सायंकाळी वाशिमला पोहोचले होते. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ते लगेच परतले. पालकमंत्री सामान्यतः अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी विकास कामांची चर्चा करत असतात, पण हसन मुश्रीफ यांनी वाशिममध्ये अशी कोणतीही चर्चा केली नाही. यावरून त्यांना वाशिममध्ये राहण्याची इच्छा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advantage Vidarbha 2025 : E-Marketplace राबवणार डिजीटल साक्षरता

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीपूर्वी, जिल्ह्याच्या विकास आराखड्याची तयारी करण्यासाठी नियोजन समितीचे अध्यक्ष मंजुरी घेतात. मात्र, हसन मुश्रीफ वाशिमला उपस्थित नव्हते. त्यामुळे जिल्हा विकास आराखड्याला अमरावती विभागीय आयुक्तांची मंजुरी घ्यावी लागली. या घटनाक्रमावरून, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारण्यास हसन मुश्रीफ इच्छुक नाहीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुढील आठवड्यात पालकमंत्री बदलण्याच्या घडामोडी होऊ शकतात. याबाबत विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वीच इंद्रनिल नाईक यांच्या नियुक्तीबाबत आपले समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे नाईक यांची नियुक्ती अडचणीशिवाय होईल, असे बोलले जात आहे.

Dr. Pankaj Bhoyar : सहकार क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देणार

इंद्रनील नाईक यांचे नाव आघाडीवर
वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे गेले आहे. हसन मुश्रीफ यांचे पद सोडल्यास, त्यांच्या जागी कोण येणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीत, अजित पवार गटाचे पुसदचे आमदार इंद्रनिल नाईक यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.