Washim Zilla Parishad : प्रशासकच सादर करणार अर्थसंकल्प!

The administrator will present the budget : जिल्हा परिषदेबराेबरच पंचायत समित्यांवर प्रशासक राज

Washim जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर आता प्रशासक राज सुरू झाले आहे. जिल्हा परिषदचा अर्थसंकल्प हा जि.प. सभापती यांच्या वतीने सादर होत असतो. मात्र, सध्या जिल्हा परिषदवर प्रशासक राज असल्याने २०२५ व २०२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा प्रशासक काळातच सादर होणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये विविध विकास योजनांचा समावेश राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वाशिम जिल्हा परिषद वर १७ जानेवारीपासून प्रशासक राज सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष ही पदे जोपर्यंत निवडणुकीद्वारे भरली जात नाही तोपर्यंत जिल्हा परिषदवर प्रशासक राज राहणार आहे. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषदचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे विकासाभिमुख कार्यक्रम राबविण्यावर यावर्षी भर दिला जाण्याची शक्यता आहे.

Local Body Elections : भाजप राबवतेय संविधान सन्मान अभियान !

जिल्ह्यातील सहा पंचायत समित्याचा कार्यकाळ १५ जानेवारी २०२५ रोजी संपुष्टात आला. तर जिल्हा परिषद चा पाच वर्षाचा कार्यकाळ १६ जानेवारी २०२५ रोजी संपुष्टात आला. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने १५ जानेवारी २०२५ रोजी एक आदेश जारी केला. या आदेशान्वये ज्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समित्याचे गटविकास अधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहतील.

Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणीचं ओझं नाही !

यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती यांच्या सर्व अधिकारांचा वापर करणे. त्यांची सर्व कर्तव्य पार पाडण्याचा अधिकार योजना अध्यक्ष-उपाध्यक्ष यांची पदे भरली जात नाहीत तोपर्यंत लाभ ते प्रशासक म्हणून राहणार असेही आहेत.