Rohit Pawar accuses government on neglecting farmers : शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, रोहित पवारांचा सरकारवर आरोप
Mumbai : राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त झाला असून कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. मात्र, सरकारकडे निधी नसल्याचे सांगितले जात असतानाच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर तब्बल ४० लाखांहून अधिक खर्च झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत म्हटले की, “वर्षा निवासस्थानी डबल बेड, मॅट्रेस, सोफा यासाठी २०.४७ लाख रुपये आणि किचन दुरुस्तीसाठी १९.५३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. एकूण ४० लाखाहून अधिक पैसा केवळ ऐशआरामासाठी खर्च होतोय. शेतकरी मात्र मदतीअभावी आत्महत्या करतो आहे. हा जनतेच्या पैशाचा उपहास नाही का?” असे त्यांनी विचारले.
Vote theft case : अधिकाऱ्यांच्या पडताळणीशिवाय हे शक्यच नाही !
राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पैसा नसल्याचे सांगते, पण दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा खर्च केला जातो, हे दुहेरी धोरण असल्याचा आरोपही पवारांनी केला. “रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता, तशीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीस यांना फटकारले.
OBC Reservation : उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली, उपचार घेण्यास दिला नकार
दरम्यान, गेल्या दीड महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल असताना सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
___