Water crisis : मलकापुरात १५ दिवसाआड पाणीपुरठा, नागरिक संतापले

Water Supply Once Every 15 Days in Malkapur
: राष्ट्रवादीचे जलसमाधी आंदाेलन, कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध

Malkapur शहरात गत काही दिवसांपासून १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे, नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे शहराध्यक्ष चेतन जगताप यांच्या नेतृत्वात श्रीक्षेत्र धुपेश्वर येथे जल समाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबध्द करीत पो.स्टे. ला नेले. त्यानंतर नगर पालिका प्रशासनाने लेखी आश्वासन देत आंदोलनकर्त्यांना शांत केले.

मलकापूर शहराला श्रीक्षेत्र धुपेश्वर येथून नगर परिषदेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या काही महिन्यापासून मलकापूर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून पाणी पुरवठा तब्बल १५ दिवसांवर येवून पोहचल्याने विशेषतः महिला वर्गाला व शहर वासियांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. तसेच होणाऱ्या पाणी पुरवठ्यामधून दुर्गंधीयुक्त व गढूळ पाणी येत असल्याने शहर वासियांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. याकडे तातडीने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष चेतन जगताप यांनी केली होती.

Local Body Elections : अकोल्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

रेल्वे स्थानकाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत आंदोलनकर्त्यांनी धुपेश्वर येथे जलसमाधी आंदोलनाला जाणार हाेते. मात्र, शहर पोलिसांनी त्याठिकाणी येत त्यांना स्थानबध्द केले. त्यानंतर न.प. चे प्रशासक व तहसीलदार राहुल तायडे यांचेसह नगर परिषदचे अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यामधून सकारात्मक चर्चा करीत लवकरच पाणी पुरवठा ८ ते ९ दिवसांवर व सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.