Breaking

Water crisis : पाण्यासाठी महिलांचा पालिकेतच ठिय्या!

Women protest in the municipal council against water shortage : टंचाईने त्रस्त नागरिकांच्या असंतोषाचा भडका

Sindhkhed raja त्रिगुणी पार भागातील पाणीटंचाईने नागरिकांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. शनिवार, दि. १४ जूनला संतप्त महिलांनी थेट नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याचा आरोप करत महिलांनी पालिकेवरील विश्वास हरवला आहे. त्यांनी एकजुटीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

गेल्या आठवड्यात चोखासागर (खडकपूर्णा) या जवळच्या धरणाचा विद्युत पंप बंद पडला होता. त्याचा विपरीत परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला असला तरी काही भागांपर्‍यंत पाणी परत आले, परंतू त्रिगुणी पार व लगतचे भाग अजूनही पाण्यावाचून आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांनंतरच आन्दोलन स्थगित करण्यात आले असले, तरी या प्रकारामुळे पालिकेचे कारभाऱ्यांवरील असंतोष अधिक चिघळला आहे.

Vijay Wadettiwar : शरद पवारांच्या बोलण्याचे दोन-तीन अर्थ असतात, त्यामुळे…

दहा दिवसांपासून सुरु असलेल्या असंतोषाचा विचार न करणारा कारभार, रिक्त पदांमुळे अधिकच ढासळला आहे. नियमीत पाणीपुरवठा, तांत्रिक बिघाडांवरील कारवाही व जनतेचे आरोग्य जपणे ही मुख्याधिकारी व अभियंत्यांची प्रमुख जबाबदारी असते. परंतू, मागील आठवड्यात अभियंता सतीश वाकडे यांची बदली झाल्यानंतर या पदावर नवीन नियुक्ती झालेली नाही.

Buldhana Zilla Parishad : ग्रामपंचायतींच्या कारभारावर जिल्हा परिषदेचे लक्ष!

मुख्याधिकारी एकटेच मलकापूरचेही काम सांभाळत असलेल्या स्थितीत, या कारभाराचा तोल ढासळला आहे. लोकांमध्ये असंतोष असतानाही अधिकाऱ्यांनी वेळेवर कारवाई न केल्यास, या प्रश्नाचा राजकीय प्रभाव अधिक खोल जाईल, असे मानण्यात येत आहे.