Breaking

Water crisis : पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेचा जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या!

Shiv Sena vandalizes the office of Maharashtra Jivan Pradhikaran : चालढकल केल्याचा आरोप; संतप्त कार्यकर्त्यांकडून कार्यालयात तोडफोड

Akola ग्रामीण भागातील गावांना पाणीपुरवठा नियमित होत नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयात शिवसेनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. गेल्या दोन महिन्यांपासून अधिकाऱ्यांकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयात तोडफोड करण्यात आली.

खारपानपट्ट्यातील दापुरा, माजलापूर परिसरात पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर असून, खांबोरा पाणीपुरवठा योजनेतून परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो. सद्या या भागात 10 ते 15 दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

Education Department : गैरव्यवहार होत असताना शिक्षण विभाग गप्प का?

याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून सातत्याने चालढकल केली जात असल्याने शिवसेना उपनेते आ. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मंगेश काळे , शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना ग्रामीण पाणीपुरवठाबाबत जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने शिवसेनेच्या संतप्त कार्यकऱ्यांकडून कार्यालयात तोडफोड करण्यात आली.

load shedding : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची महावितरणच्या कार्यालयात धडक

यावेळी शिवा मोहोड, ज्ञानेश्वर गावंडे, शहर प्रमुख युवासेना विक्की इंगळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल घरडे, सागर अत्तरकार, शुभम भारसाकळे, उज्वल काळणे, केतन पाटील, हषेल गावडे, सिकंदर शाहा, संतोष गावंडे आदींची उपस्थिती होती.