Hand pumps closed in the entire Wardha district : वर्धा जिल्ह्यातील भीषण वास्तव, ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई
Wardha ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वर्धा जिल्ह्यातील भीषण वास्तव पुढे आले आहे. जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांमधील २२ हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येणार आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत २२ हातपंप बंद अवस्थेत पडले आहेत. यात वर्धा ६, सेलू १, देवळी ३, हिंगणघाट ५, समुद्रपूर ६, आर्वी १ या तालुक्यात हातपंप बंद अवस्थेत आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना भटकंती करावी लागू नये, यासाठी गावात हातपंप सुरू करण्यात आले. योग व्यवस्थापन नसल्यामुळे अनेक हातपंप बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. आता उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे बंद हापशीमुळे वादाचे प्रसंग उद्भवत असतात. तर हंडाभर पाण्यासाठी जाण्यासाठी उशीर होत आहे.
Water shortage issue : साडी नेसून उपसरपंचाने फोडला पाण्यासाठी टाहो!
गाववस्तीमधे हातपंप यांना महत्त्व आहे. आजही अनेक वस्त्यांचे नागरिक हातपंपाच्या मदतीने पाणीभरणा करतात. परंतु, काही ठिकाणी सरकारी नळ योजना आल्यामुळे हातपंपाकडे शासन व नागरिकांचे दुर्लक्ष होत गेले. अनेक हातपंप खराब होत गेले. खराब झालेल्या हातपंप दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागामार्फत केले जाते. जिल्ह्यात सध्या १७९ हातपंप सुरू असल्याची फेब्रुवारी महिन्याची आकडेवारी आहे. तर २२ हातपंप दुरुस्तीच्या अवस्थेत आहेत. या विभागाकडे दुरुस्तीसाठी लागणार मजूर वर्ग अहे.
यांत्रिकी विभागात काही पदे रिक्त होती. परंतु, ती पदे भरण्यात आली आहे. त्यामुळे कामाचा ताण कमी झाला आहे. पाणीटंचाई निवारणार्थ दरवर्षी उपाययोजना कराव्या लागतात. यात विहिरी अधिग्रहण व टँकरचा समावेश असतो. जलजीवन मिशन योजनेची काम निधीअभावी अपूर्ण आहेत. उन्हाळ्यात विहिरी आटल्यामुळे वाड्या-वस्त्यांतील वातावरण तापले आहे.








