Breaking

Water shortage issue : साडी नेसून उपसरपंचाने फोडला पाण्यासाठी टाहो!

Upsarpanch wore the saree to protest for water shortage : अभिनव निषेध आंदोलनाने वेधले लक्ष

Bhandara जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील एका उपसरपंचाने चक्क साडी नेसून पाण्याचा प्रश्न मांडला. या अभिनव निषेध आंदोलनामुळे हा उपसरपंच चांगलाच चर्चेत आला आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील परसवाडा या गावात पाण्याची समस्या नेहमीच भेडसावत आहे. मार्च महिना सुरू झालेला असताना या गावातील महिलांना पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. गेल्या वर्षापासून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. पाण्याची टंचाई भेडसावत असल्याने महिलांना खूप संकटांना सामोरे जावे लागते. जागतिक महिला दिनी महिलांना भेडसावणाऱ्या या प्रश्नाची तड लावण्यासाठी उपसरपंच पवन खवास यांनी अभिनव आंदोलन केले.

ZP health department : दहा वर्षांपासून भांडारातच खितपत पडल्या औषधी!

यासंदर्भात स्थानिक जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे अनेकदा निवेदने दिली आहेत. परंतु गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनाही निवेदने दिली. परंतु या समस्येचे निराकरण झाले नाही.

Congress MP Balwant Wankhede : महायुतीच्या घोटाळ्यांची पोलखोल करा!

लालफितशाहीच्या या अक्षम्य दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी परसवाडा येथील उपसरपंच पवन खवास यांनी अभिनव आंदोलनाची शक्कल लढविली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांनी साडी नेसून जीवन प्राधिकरणचे कार्यालय गाठले. डोक्यावर मडके व कमरेभोवती साडी अशा वेषात उपसरपंच यांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयाच्या पायर्यांवर पाण्याने भरलेले मडके फोडले व या मागणीसाठी यापूर्वी दिलेल्या निवेदनाच्या प्रती पेटवून देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील ल हेमंत बांधते हजर होते. या अभिनव आंदोलनामुळे उपसरंपच पवन खवास यांचे अभिनंदन केले जात आहे.