Breaking

Water shortage : ३२ हातपंपांसाठी आमदार मुनगंटीवार यांनी मिळवली प्रशासकीय मान्यता !

MLA Mungantiwar obtained administrative approval for 32 hand pumps : ६९ लाख ६० हजार रुपये खर्चून होणार कामे

Chandrapur : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) काल (१५ मे) अरबी समुद्रात दाखल झाले आहेत. त्यामुळे ढगाळ वातावरण आहे. उन्हाच्या दाहकतेपासून नागरिकांना तूर्तास दिलासा मिळाला असला तरी पाणी टंचाईची समस्या जेसे थे आहे. हे लक्षात घेता राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात ३२ नवीन हातपंपांना मंजुरी मिळवली आहे.

आमदार मुनगंटीवार यांनी या हातपंपांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. ३२ हातपंपंसाठी ६९ लाख ६० रुपयांच्या खर्चाला त्यांनी प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली आहे. यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागात उन्हाळ्यात भासत असलेल्या तीव्र पाणी टंचाईची गंभीर दखल आमदार मुनगंटीवार यांनी घेतली आणि त्यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न केले. नागरिकांच्या मुलभूत गरजांवर तातडीने पाठपुरावा केल्यामुळे शासनाने हा निर्णय केला आहे.

Chandrashekhar Bawankule : भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही मिळणार रेशन

मंजूर झालेल्या निधीतून बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे, विसापूर, बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्ड, पंडित दिनदयाल वार्ड, कन्नमवार वार्ड तसेच आरओ मशीनजवळ हातपंप बसवण्यात येत आहेत. मूल तालुक्यातील कारवान, कांतापेठ, कोरंबी, टोलेवाही, पिपरी दिक्षीत, बोडाळा (बु.) तर पोंभूर्णा तालुक्यातील आंबी तुकूम, घनोटी तुकूम, चक ठाणेवासना, चक फुटाणा, थेरगांव रय्यतवारी आणि दिघोरी तसेच चंद्रपूर तालुक्यातील बोर्डा, जुनोना रयतवारी, दुर्गापूर या गावांतही हातपंप बसवण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.

Youth Congress : कुणाल राऊत म्हणतात, व्हेंडरने दिली राजकीय कारकिर्द बरबाद करण्याची धमकी

आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पाणी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. मुलभूत सुविधांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आणि जनतेसाठी तत्परतेने कृती करणारे जागृत लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मुनगंटीवार यांची भूमिकाही या निर्णयातून अधोरेखीत झाली आहे.