Chandrashekhar Bawankule says that the cost of schemes increases due to electricity bills : पाणी पुरवठा विभागाने तात्काळ आराखडा सादर करावा
Nagpur : ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढलेली असताना पाणी पुरवठा योजनांना घरघर लागते. परिणामी जनतेचे हाल होतात. खरे पाहता वाढत्या वीज देयकांमुळे पाणी पुरवठा योजनांचा खर्च वाढतो. त्यामुळे आता योजनांमध्ये शक्य तेवढा सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे. असे केल्यास देखभाल, दुरूस्तीसाठी जो निधी दर्शवला जातो, त्यामध्येही मोठी बचत करण्याची संधी आहे, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
अनेक पाणी पुरवठा योजना चालवण्याचा खर्च हा वीज देयके व इतर खर्चांमुळे मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यावरून ग्राहकांनाही तसेच दर आकारले जातात. हे दर जर कमी करायचे असतील आणि मेंटेंनन्सचा खर्चही कमी करायचा असेल तर पाणी पुरवठा योजनांमध्ये सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे. त्यासाठी पाणी पुरवठा विभागाने तात्काळ सौर ऊर्जेबाबत आराखडा सादर करावा. यासाठी लागणारा निधी खनिज निधीतून उपलब्ध करून देऊ, असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.
Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारले तर बँकांची खैर नाही
माफसूच्या जमिनींवरील अतिक्रमाणाबाबत महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, नागपुरातील अंबाझरी तलावाच्या लगत असलेली जमीन विद्यापीठाची आहे. या जमिनीवर झालेले अतिक्रमण कोणत्याही व्यक्तीच्या मालकीचे होऊ शकत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्यामुळे हे प्रकार घडतात. कारवाई केल्यानंतर अतिक्रमणधारक न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवण्यासाठी अर्ज करतात. अशा वेळी माफसूच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा न करता आपली बाजू भक्कमपणे मांडणे आवश्यक आहे. यापुढे हलगर्जीपणा केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विद्यापीठातील संबंधित अभियंते, रजिस्ट्रार आणि दोषींची विभागीय चौकशी लाऊन कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.