Weather updates : सावधान… आजही जोरदार पावसाची शक्यता अलर्ट जारी!

Rain wreaks havoc across state, flooding everywhere, six deaths : राज्यभरात पावसाचा कहर, सर्वत्र पूरस्थिती, सहा बळी

Mumbai: महाराष्ट्रात पावसाने कहर केला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असून, शनिवारी 24 तासांत तब्बल 244.7 मिमी पावसाची नोंद झाली. ही गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद मानली जात आहे. सलग पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने नागरिक, ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले असून, आतापर्यंत सहा जणांचा बळी गेला आहे. विदर्भात चार जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण बेपत्ता आहेत तर तीन जण जखमी झाले आहेत. अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, भंडारा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात मांजरा नदीला आलेल्या पुरात एक शेतकरी वाहून गेला. त्याचबरोबर भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पावसाने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान केले असून, खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत.

Adivasi Pardhi Development Council : आदिवासी पारधी कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकुल !

कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम आहे. अनेक नद्यांना पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीवर 17 ते 20 ऑगस्टदरम्यान 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला राहणार आहे.

हवामान विभागाने आज रविवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि घाटमाथ्यावरील भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

सलग मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील आठही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून, नागरिकांना पूरग्रस्त भाग टाळण्याचे, धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Three new police stations : नागपूर जिल्ह्यात तीन नवे पोलिस स्टेशन्स होणार !

महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने पुढील काही दिवस परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सोबतच ग्रामस्थ नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.