Wet drought : हिंदू नाही तर बळीराजा खतरे में…! ओला दुष्काळ जाहीर करा !

Rohit Pawar demands immediate decision from the government : रोहित पवारांची सरकारकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी

Mumbai : महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाडा, जळगाव, अहमदनगर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक नागरिकांना पुरात अडकलेल्या ठिकाणांहून हेलिकॉप्टर आणि बोटींच्या साहाय्याने स्थलांतरित करण्यात आले. पुढील आठवडाभर पावसाचा जोर कायम राहील आणि शुक्रवारी त्याचा प्रभाव आणखी वाढेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले –
“अतिवृष्टीमुळे राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. जाती-धर्मातील वाद सोडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मायबाप सरकारने पुढे यावे. आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळे बळीराजाचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. नुकसान पाहता शेतकऱ्यांना ठरविक निकषांपेक्षा कितीतरी अधिक मदत मिळणे गरजेचे आहे. आज हिंदू नाही तर बळीराजा खतरे में आहे! पंचनाम्याचा हट्ट न धरता आजच्या कॅबिनेट बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची घोषणा करावी आणि हीच योग्य वेळ असल्याने कर्जमाफीही जाहीर करावी.”

Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांसोबत जिल्हा नियोजन बैठकीत घुसू, शिवसेनेचा इशारा

धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. कळंब तालुक्यात मांजरा नदीला महापूर आला असून नदीचे पाणी शेतांमध्ये घुसले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली दृश्ये या पुराची भीषणता अधोरेखित करतात. प्रशासनाने नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अनेक घरं आणि शेती पाण्याखाली गेली आहेत. एनडीआरएफच्या पथकांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. माजलगाव धरणातून प्रचंड पाण्याचा विसर्ग सुरू असून, सिंदफणा नदीला महापूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. माजलगावचा हायवे पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

Local Body Elections : स्थानिक निवडणुकीचा कलगितुरा रंगणार!

अवकाळीनंतर आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांना उध्वस्त केले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान आणि वाढत्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांची ओला दुष्काळ आणि कर्जमाफीची मागणी सध्या चर्चेत आहे.