Wet drought : निकष आडवे आले, शेतकऱ्यांची आशा मोडली, सिंदखेडराजात ओला दुष्काळ जाहीर होणार नाही?

Villages with over 65 mm rainfall listed; others denied farmer aid : ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस असलेली गावे यादीत; उर्वरित शेतकरी मदतीपासून वंचित

Sindhked raja सिंदखेड राजा तालुक्यात यंदा पावसाने थैमान घातले. संततधार पावसामुळे पिके वाहून गेली, जमिनींची चिखलदरी झाली, तर काही भागांत ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आशेचे अश्रू पावसाच्या धारांमध्ये मिसळले. निसर्गाने हाती आलेला तोंडी घासही हिसकावून घेतला. त्यामुळे सरसकट ओला दुष्काळ जाहीर होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र शासनाच्या निकषांमुळे या अपेक्षांवर पाणी फिरले असून तालुका सरसकट दुष्काळाच्या यादीतून बाहेर राहणार आहे.

महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे की, तालुक्यात सलग १० दिवसांचा पाऊस झालेला नसल्याने निकषांप्रमाणे संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त ठरू शकत नाही. मात्र ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद असलेल्या मंडळातील काही गावे मात्र या यादीत समाविष्ट झाली आहेत. यामुळे काही शेतकऱ्यांना मदत मिळेल; पण ज्यांची पिके आणि शेती दोन्ही उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना केवळ निकषात न बसल्याने शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.

Navneet Rana : गणेशोत्सव काळात आंदोलन नको; नवनीत राणांची मनोज जरांगे यांना विनंती

दरम्यान, संपूर्ण तालुका पावसाने उद्ध्वस्त झाल्यानंतरही निकषाच्या नावाखाली मदत रोखली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. नुकसानग्रस्त भागांना नेत्यांनी भेटी देऊन पाहणी केली असून, अनेकांनी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. पण शासनाने ठरवलेल्या नियमांमुळे हा मार्ग बंद झाला आहे.

Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा, मनोज जरांगेंना थेट इशारा;

सिंधखेडराजातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. काहींची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली, तर काहींच्या शेतातील उभे पीक वाहून गेले. जमीन रुतून बसल्याने पेरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने वैयक्तिक पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे; मात्र संपूर्ण तालुक्यासाठी मदत जाहीर न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा धुळीस मिळाल्या आहेत.