Breaking

Pravin Darekar : दरेकरांनी स्पष्टच सांगितलं, ‘पत्रकार नेत्यांची दिशा बदलवू शकतात’

 

Will discuss the issue of toll exemption for journalists with CM : पत्रकारांना टोलमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार

Sangli नेते आणि पत्रकार यांच्या नात्यात कधी गोडवा तर कधी रुसवा बघायला मिळतो. कधी एखाद्या नेत्याला उंचावर नेऊन बसवायचे तर कधी त्याच नेत्याला धाडकन खाली पाडायचे. हे काम फक्त पत्रकारच करू शकतात. राजकारणी ही बाब खासगीत बोलून दाखवतात. पण भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात स्पष्टच मत मांडलं आहे.

पत्रकार एखाद्या नेत्याची दिशा बदलू शकतात. तशीच दशाही बदलू शकतात. ही ताकद पत्रकारांच्या लेखणीत असते. पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांनी अनेक इतिहास उभे केलेत. अनेक विषय चव्हाट्यावर मांडून ते मार्गी लावण्याचे काम याच मातीतील पत्रकारांनी केले आहेत. पत्रकारांना भेडसावणाऱ्या टोलमाफीच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. तालुका व जिल्ह्याच्या पत्रकारांना सवलत कशी मिळेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन. असे आश्वासन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले.

Nitin Gadkari : सर, हेल्मटशिवाय गाडी चालवणाऱ्याला जेलमध्ये टाकता येईल का ?

सांगलीतील ऐतवडे खुर्द येथील वारणा महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागातर्फे बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिनाचा कार्यक्रम झाला. यावेळी ‘पत्रकार सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दरेकर बोलत होते. याप्रसंगी वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, भाजपा विधानपरिषद आमदार प्रसाद लाड, माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत, स्थानिक आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार भगवान साळुंखे, वनश्री दूध संघाचे अध्यक्ष सम्राट महाडिक यांसह शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘पोस्टर लावून मतं मिळत नाहीत’

आज पत्रकारांचा कार्यक्रम आहे. पत्रकारितेच्या चळवळीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम आहे. मीही एक साप्ताहिक चालवतो. त्यामुळे छोट्या पत्रकारांच्या व्यथा, अडचणी काय असतात याची नीट माहिती मला आहे. ग्रामीण, तालुक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या पत्रकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतेय. पत्रकारांनी टोलमाफीचा प्रश्न सांगितला आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन. तालुका, जिल्ह्याच्या पत्रकारांना सवलत कशी मिळेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दही दरेकरांनी यावेळी पत्रकारांना दिला.