Women safety : आपत्कालीन स्थितीत on the spot मदत

On-the-spot help in case of emergency : महिला सुरक्षेसाठी बुलढाणा पोलिसांचा उपक्रम

Buldhana वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत महिलांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी बुलढाणा पोलिसांनी अभिनव उपक्रम राबवला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या हस्ते या विशेष हेल्पलाइन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.

या नव्या सुविधेमुळे महिला, मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या पोलिस मदत, कायदेशीर सल्ला आणि तक्रार नोंदविण्याची सोय मोबाईलवरूनच मिळणार आहे. यासाठी खास हेल्पलाइन लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रथम या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

BJP District President : नांदेड ग्रामीणला उसना जिल्हाध्यक्ष का दिला जातो?

नोंदणीच्या वेळी संपूर्ण नाव, संपर्क क्रमांक, गाव व पोलिस ठाण्याचे नाव ही माहिती भरावी लागते. नोंदणीनंतर संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येतो. गरज असल्यास पोलिस स्टेशनचा नकाशावरील मार्गही मिळतो.

महिलांसाठी उपलब्ध सुविधा :

दामिनी पथकाची त्वरित मदत,वैद्यकीय सेवा,कायदेशीर सल्ला, लेखी किंवा ऑडिओ तक्रार नोंदणी, ऑनलाईन पोलिस तक्रार आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Dharmapal Meshram : पारधी समाज बांधवांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवू !

ज्येष्ठ नागरिकांसाठी :

शीघ्र पोलिस मदत, वैद्यकीय सहाय्य, कायदेशीर मार्गदर्शन, मोबाईलवरून थेट संपर्क साधता येणार आहे. सुरुवातीला १०३ महिलांना लिंक पाठवून या सुविधेची चाचणी घेण्यात आली आहे. लवकरच ही सेवा व्यापक प्रमाणावर सुरू होणार आहे.

“महिला, मुली आणि ज्येष्ठ नागरिकांनी हेल्पलाइन लिंकवर नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा. बुलढाणा पोलिस नेहमी त्यांच्या मदतीसाठी सज्ज आहेत,” असं बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी म्हटलं आहे.