Breaking

Workers get diarrhea due to contaminated water : दूषित पाण्यामुळे शंभर कामगारांना अतिसाराची लागण

 

More than 70 workers getting treatment : 70 पेक्षा अधिक कामगारांवर उपचार सुरू

Amravati शहरातील नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये कार्यरत कामगारांनी दूषित पाणी पिल्याने त्यांना अतिसाराची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कामगारांना अचानक अतिसार, उलट्या सुरू झाल्याने हा प्रकार उघड झाला. शंभरच्या जवळपास कामगारांना विषबाधा झाल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

यातील ७० रुग्ण हे जिल्हा सामान्य रुग्णालयात व काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने रुग्णालय गाठून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. शहरातील नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरात गोल्डन फायबर नावाची कंपनी आहे. येथे १८० च्या जवळपास कामगार कार्यरत आहेत. या कंपनीमध्ये धागा तयार केला जातो. सकाळी ८ वाजताच्या शिफ्टमध्ये येथे कामगार कामावर आले. यावेळी त्यांनी येथील पाणी पिल्यानंतर काही वेळाने त्यांना त्रास सुरू झाला.

Dr. Pankaj Bhoyar : रोजगारासाठी वरदान ठरेल ‘इको पार्क’

हा प्रकार लक्षात येताच सुरुवातीला कंपनीने खासगी डॉक्टरांना बोलवून उपचार सुरू केले होते. परंतु याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील यांना मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांच्या मदतीने कंपनी गाठली. यानंतर विषबाधा झालेल्या कामगारांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली. जवळपास ४१ कामगार हे इर्विन रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. यामध्ये ३६ महिला, तर ५ पुरुष कामगारांचा समावेश आहे.

Gondia Zilla Parishad Elections : काय असेल सत्तास्थापनेचा फॉर्म्युला?

 

यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठून विषबाधा झालेल्या महिलांकडून संबधित प्रकार जाणून घेतला. यावेळी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

कंपनी अधिकाऱ्याला मारहाण
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर काही वेळाने येथे युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्तेदेखील कामगारांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी रुग्णालयात असलेले कंपनीचे एचआर प्रमुख मंगेश रोडे यांना त्यांनी संबंधित प्रकाराविषयी विचारणा सुरू केली. यावेळी सकारात्मक उत्तर न मिळताच या कार्यकर्त्यांनी एचआर हेडला मारहाण करायला सुरुवात केली