Changes in factory law, impact on private employees : कारखाना कायद्यात बदल, खाजगी कर्मचाऱ्यांवर परिणाम
Mumbai : महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाने कारखाना कायदा 1948 मध्ये मोठा बदल करत कामकाजाचे तास वाढवले आहेत. आता कामगारांना दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास आणि आठवड्याला 48 तासांऐवजी 60 तास काम करावे लागणार आहे. या निर्णयामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे.
अतिकालिक कामासाठी कामगारांना दुप्पट वेतनाचा मोबदला मिळणार असून त्यासाठी लेखी संमती आवश्यक असेल. तसेच ओव्हरटाईमची मर्यादा 115 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पाच तासांनंतर अर्धा तास आणि सहा तासांनंतर पुन्हा अर्धा तास विश्रांतीची तरतूद करण्यात आली आहे.
New GST rate : केंद्र सरकारचा दिवाळी धमाका! टीव्ही, कपडे, खाद्यपदार्थ स्वस्त !
केंद्र सरकारच्या ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’ धोरणानुसार हे बदल करण्यात आले असून याआधी उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये अशा सुधारणा झाल्या आहेत. उद्योगांना गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी लवचिकता मिळेल तर कामगारांना अतिरिक्त आर्थिक लाभ आणि हक्कांचे संरक्षण मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.