Prime Minister Narendra Modi in Mumbai on Maharashtra Day : वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेेन्टमेंट समिटचे आयोजन
Mumbai : वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेेन्टमेंट समिटच्या WAVES आयोजनाचे यजमानपद महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्र दिनापासून याची सुरूवात होणार आहे. ४ मेपर्यंत भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १ मे रोजी दिवसभर मुंबईत असणार आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत Uday Samant यांनी दिली.
सोमवार, दि . २८ एप्रिलला बीकेसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उद्योग मंत्री सामंत यांनी या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही सहभाग असणार आहे.
Water Conservation Department : गुगलसोबत होणार जलसंधारणाच्या कामांची पाहणी !
मनोरंजनाच्या क्षेत्रात मुंबई हे देशात क्रमांक एकचे शहर आहे. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी महाराष्ट्रात मराठी चित्रपट सुरु केले. त्यामुळेच मुंबईला मनोरंजन क्षेत्राचे विशेषतः हिंदी चित्रपटसुष्टीचे माहेरघर म्हटले जाते. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक क्रमांक एकवर आहे. त्यामुळेच उद्योग क्षेत्रातही महाराष्ट्र आणि मुंबई पहिल्या नंबरवर आहे, असे उदय सामंत म्हणाले.
Bravery awards and jobs : हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना शौर्य पुरस्कार व नोकरी द्या !
या कार्यक्रमात ३३ देशांतील मंत्री, मंत्रीस्तरीय अधिकारी आणि १२० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बॉलीवुड, टॉलीवुड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार व निर्मातेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पर्यटनाच्या सगळी स्थळांची जागतिक पातळीवर ओळख व्हावी, हादेखील या आयोजनाचा उद्देश आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक संस्कृती, औद्योगिक संस्कृती, पर्यटन संस्कृती आणि सर्व परंपरांची जागतिक पातळीवर ओळख व्हावी, यासाठी केंद्र शासनाने मुंबई शहराची निवड केल्याचेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.