Breaking

Yatras in India : रेल्वे तिकीटांवर सिंदूर आणि मोदींचा फोटो, कोण करतंय राजकारण ?

Sindoor and Modi’s photo on railway tickets, who is doing politics Asked Congress Leader Vijay Wadettiwar : काही नेत्यांकडून हिंदू – मुस्लीम भांडणे लावण्याचे काम सुरू

Nagpur : काँग्रेस नेते सैन्याचे खच्चीकरण करत आहेत, सतत भारतीय सैन्याच्या विरोधात बोलत आहेत, राजकारण करत आहेत, असे आरोप सत्ताधाऱ्यांकडून आमच्यावर केले जात आहेत. पण त्यांच्या टिकेला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही. कारण रेल्वे तिकीटांवर सिंदूर आणि मोदींचा फोटो टाकून राजकारण कोण करत आहे, हे आपण सर्वजण पाहातच आहोत, असा हल्लाबोल काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केला.

नागपुरात आज (२१ मे) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सैन्याच्या सन्मानार्थ आणि सद्भावनेचा दिवस म्हणून राजीव गांधी यांची पुण्यतिथी सर्व धर्मांचा समान अधिकार आणि वागणूक समाजात निर्माण व्हावी, यासाठी राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तिरंगा रॅली काढली जात आहे. काही नेत्यांकडून हिंदू – मुसलमानांमध्ये भांडणे लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सद्भावना निर्माण व्हावी, सर्व जाती धर्म पंथांनी मिळून आलेल्या संकटाला एकतेचा संदेश द्यावा, यासाठी आज ‘जरा याद करो कुरबानी’ रॅली काढली जात आहे.

Modi Government : नेहरुंनी विशेष अधिवेशन बोलावून लोकांना उत्तरे दिली होती, अन् आता..

गेली १० वर्ष केंद्रात मोदी सरकार आहे. पाकिस्तानशी पूर्ण युद्ध करण्याची हिंमत दाखवली नाही आणि मदतीसाठी खासदारांचे डेलीगेशन पाठवले जात आहे. या डेलीगेशन्सचा काय फायदा होईल, हे वेळच सांगेल. पण आपले परराष्ट्र धोरण योग्य नव्हते, हे यावरून सिद्ध होत आहे. युद्ध लहान झालं की मोठं झालं, याचा विचार करून उपयोग नाही. यात भारताचं किती नुकसान झालं, किती शस्त्र वापरले, हे बघितलं पाहिजे.

Caste Census : जातीय जनगणनेचा निर्णय बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर !

चायनाने बनवलेले १५ हजाराचे पाकिस्तानचे ड्रोन नष्ट करण्यासाठी १५ लाख रुपयांचे मिसाईल्स भारताने वापरले. ही चायनाची पॉलीसी आहे, अशी चर्चा आता होते आहे. यातील सत्यता काय, हेसुद्धा जनतेला जाणून घ्यायचे आहे. सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. काय नुकसान झालं, काय नाही, याची माहिती देशाला दिली पाहिजे. नुकसान किती झालं, हे सांगण्यात कुठलीही चूक नाही. मल्लिकार्जुन खरगे यांनी हीच माहिती मागितली आहे. सरकारने यातील सत्यता सांगावी, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.