Naxal Dalam commander is hiding in Yavatmal : नक्षल दलमच्या कमांडरच्या शोधात पोलीस
Yavatmal झारखंडमधील हुुहुर्रू दलमचा कंमाडर राहिलेला जहाल नक्षली यवतमाळात वास्तव्याला असल्याची गाेपनीय माहिती पाेलिसांनी मिळाली आहे. नव्वदच्या दशकात नक्षल चळवळीत सक्रिय राहून त्याने अनेक कारवायांचे नेतृत्व केले आहे. मिळालेल्या माहितीवरून पाेलिस त्याच्या मागावर आहेत. झारखंड पाेलिसांसाेबत देखील यवतमाळ पोलीस संपर्कात आहेत.
नक्षल चळवळीत वणी आणि यवतमाळचा काही भाग हा रेस्ट झाेन हाेता. पाेलिस कारवाईचा दबाव वाढल्यानंतर येथे नक्षली ओळख लपवून आश्रयाला राहायचे. यातूनच कधीकाळी नक्षल दलम कमांडर असलेली व्यक्ती यवतमाळातील गाेदाम फैल भागात २०१३ पासून वास्तव्याला असल्याची माहिती यवतमाळ पाेलिसांना मिळाली. तेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्याच्या मागावर आहे.
हा दलम कमांडर झारखंड राज्यातील हुहुर्रू दलममध्ये काम करत हाेता. त्याच्यावर नक्षल चळवळीसाठी आर्थिक वसुलीची जबाबदारी हाेती. त्याने भूसुरुंग स्फोट घडवून आणले आहेत. पाेलिसांसाेबत चकमकीत प्रतिहल्ला करण्याचा आणि सीआरपीएफ जवानाची हत्या केल्याचाही आराेप त्याच्यावर आहे. दलमच्या आर्थिक व्यवहारात गडबड केल्याने त्याने झारंखडमधून जीवाच्या भीतीने मुंबई गाठली.
Crime in Nagpur : पाळत ठेवली तेव्हा कळले तो दोन मुलांचा बाप आहे!
तिथे काही वर्षे बाेरिंगच्या मशीनवर काम केल्यानंतर ताे एका व्यक्तीच्या माध्यमातून यवतमाळात आला. येथे ताे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती पाेलिसांना आहे. त्यावरूनच पाेलिस त्याचा शाेध घेत आहेत. त्या संशयित नक्षल दलम कमांडरची ओळख पटविण्यासाठी झारखंड पाेलिस यवतमाळात येणार आहेत.
Sudhir Mungantiwar : शिवचरित्राचा प्रसार, मुनगंटीवारांचा अपार प्रयास !
त्यानंतरच संशयित व्यक्ती खरंच दलम कमांडर आहे का, याची पडताळणी हाेणार आहे. एकूणच याबाबत स्थानिक पाेलिसांनी अधिकृत माहिती देण्याचे टाळले आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकाने नक्षल चळवळ माेडीत काढण्याची माेहीम हाती घेतली आहे. पाेलिसांच्या सतत कारवायांमुळे नक्षल चळवळीच्या कारवाया कमी झाल्या आहेत. पण, चळवळ पूर्णपणे संपलेली नाही, याची जाणीव पोलीस प्रशासनाला आहे.