Breaking

Yavatmal Police : जहाल नक्षलवादी दिलीप महतो याला अटक!

 

Naxal Dalam commander was hiding in Yavatmal : झारखंड पोलिसांच्या समन्वयाने यवतमाळ पोलिसांची कारवाई

Yavatmal झारखंडमधील भीतिया दलमचा कंमाडर राहिलेला जहाल नक्षली तुलसी उर्फ दिलीप महतो याला यवतमाळ पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली. तो यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्याला असल्याची गाेपनीय माहिती पाेलिसांनी मिळाली होती. पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात झारखंड पोलिसांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली.

नव्वदच्या दशकात नक्षल चळवळीत सक्रिय राहून त्याने अनेक कारवायांचे नेतृत्व केले आहे. माहिती मिळाल्यापासून पोलिसांची हालचालींवर नजर होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी संशयितावर नजर ठेवली होती. त्यांना पांढरकवडा येथील उमरी येथे एका स्टोन क्रशर परिसरात आरोपी असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्याठिकाणी पोलिसांनी जाळे पसरवले व संशयिताला घेराव घातला. पण बनावट कागदपत्रे दाखवून आरोपीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कसून चौकशी केल्यानंतर मात्र त्याने नक्षलवादी असल्याची कबुली दिली.

Congress- Leader- Anant- Gharad – Dead: ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंत घारड यांचे निधन

नक्षल चळवळीत वणी आणि यवतमाळचा काही भाग हा रेस्ट झाेन हाेता. पाेलिस कारवाईचा दबाव वाढल्यानंतर येथे नक्षली ओळख लपवून आश्रयाला राहायचे. यातूनच कधीकाळी नक्षल दलम कमांडर असलेली व्यक्ती यवतमाळातील गाेदाम फैल भागात २०१३ पासून वास्तव्याला असल्याची माहिती यवतमाळ पाेलिसांना मिळाली होती. तेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्याच्या मागावर होते.

Sex racket in Ramtek : सेक्स रॅकेटमध्ये सापडली रत्नागिरीतील तरुणी

हा दलम कमांडर झारखंड राज्यातील भीतिया दलममध्ये काम करत हाेता. त्याच्यावर नक्षल चळवळीसाठी आर्थिक वसुलीची जबाबदारी हाेती. त्याने भूसुरुंग स्फोट घडवून आणले आहेत. खंडणी, सरकारी मालमत्तेची तोडफोड, सुरक्षा दलांवर हल्ले आदी हिंसक कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. पाेलिसांसाेबत चकमकीत प्रतिहल्ला करण्याचा आणि सीआरपीएफ जवानाची हत्या केल्याचाही आराेप त्याच्यावर आहे. दलमच्या आर्थिक व्यवहारात गडबड केल्याने त्याने झारंखडमधून जीवाच्या भीतीने मुंबई गाठली.