Breaking

Yavatmal Zilla Parishad : प्रभार न सोपविता, कॅफो आठवडाभर सुटीवर!

Without handing over the charge, CAFO goes on a week-long leave : March Ending चा ताण; कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता

Yavatmal March Ending चे दिवस असताना मागील आठवडावर जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोषकुमार सोनी प्रभार हस्तांतरीत न करताच गैरहजर होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या देयके अदा करण्याच्या प्रकरणाचा चांगला खोळंबा झाला. दोन दिवसांपूर्वी ते मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयात हजर झाले असले तरी त्यांच्या कार्यपध्दतीवर कंत्राटदारांकडून रोष व्यक्त होत आहे.

मार्च एंडींग हा प्रशासनातील आर्थिक वर्षाचा अतिशय महत्वाचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये कुठल्याही शासकीय कार्यालयात वित्त व लेखा विभागाची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची असते. या प्रकारामुळे पुढील काळात तरी प्रक्रियांना गती दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोषकुमार सोनी हे ३१ मार्च रोजी शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होणार आहेत. मुदतवाढीसाठीही त्यांच्या हालचाली सुरु आहेत.

Yavatmal Zilla Parishad : जिल्हा परिषदेसमोर ‘सेस’ निधी खर्चाचे आव्हान !

जिल्हा परिषदेतील सर्वच विभागाच्या आर्थिक व्यवहाराची प्रकरणे निकाली काढून देयके अदा करण्यासाठीचा मार्च एंडींग हा महत्वाचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये कॅफोंनी प्रभार हस्तांतरीत न करता, दिर्घकालीन सुट्यांवर जाणे योग्य नाही. मात्र मागील आठ दिवस जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रभार हस्तांतरीत न करताच कार्यालयात गैरहजर होते. त्यामुळे आर्थिक व्यवहाराशी निगडीत लेखा विभागातील कामे खोळंबली होती.

Akola Zilla Parishad : अकोला जि.प.चा आरोग्य विभाग राज्यात अव्वल

वास्तविक कॅफोंनी आपल्या पदाचा प्रभार समकक्ष अधिकाऱ्यांना हस्तांतरीत करून सुट्टीवर जाणे अपेक्षित होते. या कालावधीमध्ये त्यांच्या अनुपस्थितीमुळे कंत्राटदार मंडळींना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर त्यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.