Breaking

Youth Congress : ६० जणांच्या उचलबांगडीचा कुणाल राऊतांना फटका

Youth Congress appointed new working president : युवक कॉंग्रेसने नेमले नवीन कार्यकारी अध्यक्ष

Nagpur युवक काँग्रेसमधील अंतर्गत वाद व त्यातून ६० पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या उचलबांगडीचा प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनाच फटका बसला आहे. हे प्रकरण त्यांच्यावर उलटले असून उपाध्यक्ष असलेले शिवराज मोरे यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदमुक्त करण्यात आलेल्या ६० पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत ही घडामोड झाली आहे. राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढण्याचे नियोजन मागील पंधरवड्यात युवक कॉंग्रेसतर्फे करण्यात आले होते. मात्र ते आंदोलन फारसे यशस्वी झाले नाही. त्याचे खापर ६० पदाधिकाऱ्यांवर फोडत त्यांना पदमुक्त करण्यात आले होते.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचे प्रत्युत्तर, संजय राऊत डोक्यावर पडलेले व्हॅल्युअर

त्यात युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, महासचिव शिवानी वडेट्टीवार, केतन ठाकरे, अनुराग भोयर, मिथिलेश कन्हेरे, अक्षय हेटे यांचा प्रामुख्याने समावेश होता. यानंतर युवक काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. कारवाई झालेल्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनाच तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय प्रभारी यांच्याकडे केली होती.

या तक्रारीची शुक्रवारी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावेरू यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दखल घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी युवक काँग्रेसची निवडणूक तातडीने जाहीर करण्याची मागणी केली. यावर निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारा वेळ विचारात घेता निवडणूक जाहीर होईपर्यंत कार्यकारी अध्यक्ष म्हणून शिवराज मोरे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Local Government Bodies : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आघाडी एकत्र लढवणार की स्वतंत्र?

मोरे यांना शनिवारी तातडीने दिल्लीत बोलावून पदभार स्वीकारण्याचा आदेश देण्यात आला. तसेच युवक काँग्रेसची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. शिवराज मोरे यांच्या या नियुक्तीमुळे पदमुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये न्याय मिळाल्याची भावना आहे.