Youth-congress-protest-in-nagpur-ai-exhibition : दिल्लीतील ‘एआय’ प्रदर्शनात अर्धनग्न आंदोलन, युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला अटक
Nagpur दिल्लीतील ‘एआय’ प्रदर्शनात अर्धनग्न आंदोलन केल्याने युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांना अटक करण्यात आली आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी आज नागपूरच्या युवक काँग्रेसच्या टीमने भाजपच्या मुख्यालयाला घेराव घातला.
आमच्या अध्यक्षाच्या केसाला जरी धक्का लावला तर आम्ही शांत बसणार नाही असाही इशारा यावेळी देण्यात आला. एआय प्रदर्शनातील चिनी रोबोटवरून देशात चांगलेच वातावरण तापले आहे.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला यावरून खडे बोल सुनावले आहे. प्रदर्शनाच्या मुख्य प्रवेशदारवर काँग्रेसच्यावतीने आंदोलनसुद्धा करण्यात आले होते. दुसरीकडे राहुल गांधी देशाची बदनामी करीत आहे, त्यांना भाजपच्या कार्यकाळात होत असलेला विकास बघवत नसल्याचा आरोप भाजपच्यावतीने केला जात आहे. दोन्ही पक्षाच्या बाजूने एकमेकांच्या विरोधात देशभर आंदोलने केली जात आहेत. युवक काँग्रेसने ही लढाई व्यक्तीची नसून संविधान, सत्य आणि लोकशाहीच्या संरक्षणाची असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. दडपशाही, खोटे गुन्हे आणि आवाज दाबण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला युवक शक्ती लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून जोरदार उत्तर देईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
Sunetra pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
या आंदोलनात नगरसेवक वासीम खान, सुहास नानवटकर, प्रमोद सिंग ठाकूर सोबत युवक काँग्रेसचे तनवीर विद्रोही,अक्षय हेटे,मेहुल अडवानी,अभिजित ठाकरे,रवी पराते,हेमंत कातुरे, सागर चव्हाण, आयुष राऊत, समीर तिमांडे, अक्षय डोर्लीकर, राहुल अभंग, सुशांत लोखंडे, रजा अली, निखिल वानखेडे, अलोक कोंडापूरवार, अभिषेक वर्धन सिंग, श्रीकांत ढोलके,सचिन निंबार्ते, अमित इंगळे, वैभव कोहद, अंशुमन सरकार, सुरज महाले, अभिषेक किलनाके, यश मधने,रुबी पठाण,विजया सावरकर,अतुल नाईक, संजोग येरणे,महिला काँग्रेसच्या नॅश अली, संगीता बनाफर, माया धापोडकर, भानुमती नंदनवार, नंदा सोनारघरे, एनएसयूआयचे पृथ्वीराज सपकाळ, प्रणय ठाकूर,आयुष नवले,देव क्यावाल, सौरभ काळमेघ, वृषभ राऊत, साहिल गिऱ्हे तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनाची तीव्रता वाढताच पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले व त्यांना गणेश पेठ पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.








