Breaking

Zilla Parishad Amravati : ३७ महिन्यांपासून झेडपी शिलेदारांची दालने कुलूपबंद!

Chambers in Zilla Parishad to open after three years : चार महिन्यांत झटकली जाणार धूळ; देखभाल-दुरुस्तीसाठी मात्र तरतूद नाही

Amravati जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची दालने मागील ३७ महिन्यांपासून कुलूपबंद आहेत. त्या खोल्यांची अवस्था अत्यंत जर्जर झाली आहे. आता आगामी चार महिन्यांत निवडणुका होण्याची शक्यता असल्याने नव्या शिलेदारांसाठी या दालनांची डागडुजी केली जाणार आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, मार्च महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. परिणामी, आता जिल्हा सेस निधीचे पुनर्रचना करून या खर्चाची तरतूद करण्यात येणार आहे.

६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे दिवाळीपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती यांची निवड होईल. २० मार्च २०२२ पासून शिलेदार नसल्यामुळे दालने बंद आहेत. आता निवडणुकांनंतर या दालनांचे कुलूप उघडले जाणार असून, नव्या पदाधिकाऱ्यांना कार्यरत होण्यासाठी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.

Local Body Elections : दिवाळीपूर्वीच फुटणार झेडपीचे राजकीय फटाके!

२०१९ मधील निवडणुकांनंतर नव्या पदाधिकाऱ्यांसाठी सभागृह व दालनांची सजावट करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र २०२२ मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर दालने कुलूपबंद झाली. त्यामुळे त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पुन्हा लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत, हे निश्चित झाले आहे.