Zilla Parishad Election : पक्षप्रवेशांची स्पर्धा रंगात; मतदारांचा अंतिम निर्णय ठरणार निर्णायक

Race of party inductions heats up; voters’ final decision will be decisive : जाधवांच्या ‘मिशन मोड’ला प्रतिस्पर्ध्यांचे प्रत्युत्तर; मेहकरात लढत रंगणार

Mehkar स्थानिक राजकारणात सध्या ‘इनकमिंग’चा ट्रेंड जोर धरताना दिसत असला, तरी अंतिम राजकीय समीकरणे अजूनही अनिश्चिततेच्या छायेत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेनेने मेहकरसह सिंदखेडराजा मतदारसंघात पक्षप्रवेशांची मालिका सुरू केली असून, त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाने अक्षरशः ‘राजकीय प्रवेशद्वार’चे रूप धारण केले आहे. विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा वाढता ओघ पाहता सत्तासमीकरणे बदलत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाधव यांनी ‘मिशन मोड’ स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. नव्या चेहऱ्यांची फळी उभी करत संघटन बळकट करण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसत असला, तरी या हालचालींना विरोधकांकडूनही तितक्याच ताकदीने प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः उद्धवसेना आपले पारंपरिक मतदार व कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी सावध आणि नियोजनबद्ध पावले टाकताना दिसते.

Per capita income : दरडोई उत्पन्न १.३७ लाख, पण दिवसाला फक्त ३८० रुपये

दोन्ही गटांकडून सुरू असलेली पक्षप्रवेशांची स्पर्धा केवळ संख्याबळ वाढवण्यापुरती मर्यादित राहणार की ती प्रत्यक्ष मतदानात परिवर्तित होणार, हा खरा कळीचा मुद्दा ठरत आहे. कारण मेहकरच्या राजकारणात ‘इनकमिंग’चा जल्लोष जितका गाजतो, तितकाच अंतिम क्षणी मतदारांचा कल अनपेक्षित वळण घेतो, असा पूर्वानुभव आहे.

Ajit Pawar death : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदार अमोल मिटकरी यांचे आंदोलन

राजकीय तज्ञांच्या मते, सध्याचे पक्षप्रवेश हे वातावरणनिर्मितीचे साधन असले, तरी विजयाचा मार्ग मतदारांच्या विश्वासातूनच जातो. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये केवळ गर्दी नव्हे, तर जमिनीवरील काम, स्थानिक प्रश्नांवरील भूमिका आणि नेतृत्वाची विश्वासार्हता हेच निर्णायक ठरणार आहेत.