16 seats reserved for OBCs and 21 for the open category? : आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळांचे लक्ष, गणेशोत्सवानंतर होण्याची शक्यता
Amravati जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत १६ जागा ओबीसींसाठी तर २१ जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव राहण्याची शक्यता आहे. गट-गणांच्या अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. सप्टेंबरमध्ये आरक्षण सोडत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. अमरावती जिल्हा परिषदेसह १४ पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढील तीन-चार महिन्यांत होणार आहेत. यासाठी गट आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर प्राप्त हरकतींवर सुनावणी पार पडली असून, अंतिम निर्णय विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे.
Harshwardhan Sapkal : मराठा आरक्षणाची घोषणा करा; आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवा
या निर्णयावर अंतिम गट आणि गण रचना अवलंबून असून, ती २२ ऑगस्ट रोजी निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडती जाहीर होईल. जिल्हा परिषद निवडणुका एकूण ५९ जागांसाठी होणार असून, त्यापैकी १६ जागा ओबीसींसाठी राहतील. यामध्ये प्रत्येकी आठ महिला व आठ पुरुषांसाठी आरक्षण असेल. खुल्या प्रवर्गासाठी २१ जागा राखीव असतील.
Randhir Sawarkar : ढगफुटीमुळे घरात पाणी शिरले, तात्काळ मदतीचे आदेश
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट-गणांची अंतिम प्रभाग रचना विभागीय आयुक्तांनी २२ ऑगस्ट रोजी जाहीर केली. त्यामुळे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम गणेशोत्सवानंतर जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.