Zilla Parishad Elections : बांधकाम कामगार नोंदणी शिबिरांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी

Election preparations through construction workers’ registration camps : जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग

Khamgao जिल्हा परिषद निवडणुकांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा रंगू लागली असून खामगाव तालुक्यातही हालचाली वाढल्या आहेत.

भारतीय जनता पक्षने तालुक्यात तयारीला सुरुवात केली आहे. काही गावांमध्ये बांधकाम कामगार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांकडून सांगितले जात आहे.

मात्र, या शिबिरांकडे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आखलेल्या रणनीतीच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. स्थानिक पातळीवर मतदारांशी संपर्क वाढवणे, त्यांचा विश्वास संपादन करणे आणि संघटनात्मक बळकटी साधणे, या उद्देशाने ही तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

Nagpur Municipal corporation : काँग्रेस रविवारी ठरवणार स्वीकृत सदस्यांची दोन नावे; पराभूत उमेदवारांना ‘नो एंट्री’

दरम्यान, विरोधी पक्षांकडून या उपक्रमावर टीका करण्यात येत असून निवडणुकीच्या तोंडावरच अशा शिबिरांचे आयोजन का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तथापि, नागरिकांच्या सोयीसाठीच हे शिबिरे आयोजित करण्यात आल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे.

Gram Panchayat : शेवटी ग्रामपंचायतींचा कारभार अधिकाऱ्यांच्याच हाती, सरपंचांची मागणी धुडकावली

निवडणुकांची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, तोपर्यंत राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.