Breaking

Zilla Parishad Gondia : सभापतिपदाचा फैसला आज!

The Chairman of Gondia Zilla Parishad will be decided today : माळ कुणाच्या गळ्यात?; विषय समिती सभापती निवडणूक

Gondia जिल्हा परिषद विषय समिती सभापतिपदासाठी सोमवारी (दि.१०) होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ४० सदस्यांपैकी सभापतिपदाची माळ नेमक्या कोणत्या चार सदस्यांच्या गळ्यात पडते याची जिल्हावासीयांना उत्सुकता आहे. जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीप्रमाणेच ही निवडणूक बिनविरोध पार पडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक २४ जानेवारीला पार पडली. त्यानंतर आता बांधकाम, महिला व बालकल्याण, कृषी पशुसंवर्धन, समाजकल्याण या चार विषय समिती सभापतिपदासाठी सोमवारी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आहे. जिल्हा परिषदेत भाजपचे ३२, राष्ट्रवादी काँग्रेस ८, काँग्रेस १३, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे.

Krushna Khopde : नागपूरकरांना Ground Rent पासून मुक्ती द्या!

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण काँग्रेसकडे बहुमत नसले तरी ते सभापतिपदाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चार सभापतिपदांपैकी तीन पदे भाजपकडे राहणार आहे. एक सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे.

सभापतिपदाचे वाटप करताना चारही विधानसभा मतदारसंघाला प्रत्येकी एक सभापतिपद देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे. निवडणुकीदरम्यान कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सदस्यांना पर्यटनाला पाठविण्यात आले असून ते सर्व सोमवारी सकाळी परतणार आहेत.

RSS BJP : संघ दक्ष, बिहारकडे लक्ष!

निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्र दाखल करणे सकाळी ११ ते दुपारी १
विशेष सभेची सुरुवात दुपारी ३ वाजता
नामनिर्देशनपत्राची छाननी दुपारी ३:१५ वाजता
उमेदवारी अर्ज मागे घेणे दुपारी ३:३० वाजता
आवश्यकता भासल्यास मतदान दुपारी ४ वाजता