Breaking

Zilla Parishad school : पटसंख्या घटली, शिक्षकांवर कारवाईचा बडगा!

The number of students has decreased : ३५ अकार्यक्षम शिक्षक निलंबित, ६० जणांना कारणे दाखवा नोटीस

Buldhana जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या झपाट्याने घटत चालल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी CEO गुलाबराव खरात यांनी कडक पावले उचलली आहेत. सुमारे ३० ते ३५ अकार्यक्षम शिक्षक निलंबित करण्यात आले आहेत. तसेच ५० ते ६० शिक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिक्षणाचा दर्जा खालावत चालल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई मोठी मानली जात आहे.

जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दहाच्या आत घसरली आहे. यामध्ये सागवन (४), हनवतखेड (२), मढ उर्दू (५), कोदरखेड (२), नागझरी खुर्द (६), दोंदवाडा (४), चिंचखेड खुर्द (६), वडगाव डिघी (६) आदी २० शाळांचा समावेश आहे. ही स्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली.

Vidarbha farmers : शेतकऱ्यांचे बीज बिल माफ करा, अन्यथा तीव्र आंदोलन!

घटलेल्या पटसंख्येबाबत विचारणा केली असता शिक्षक समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. यानंतर सीईओ खरात यांनी जिल्हा परिषदेत बैठक घेऊन शिक्षकांची कानउघाडणी केली. त्यानंतर निलंबनाचे आदेश तयार करून काही प्रकरणांवर स्वाक्षरीदेखील करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

Alcohol addiction : दारूचे व्यसन पुरूषांना, जीव गमवावा लागला महिलांना !

दर्जेदार शिक्षणाचा अभाव, पालकांची कॉन्व्हेंटकडे वाढती ओढ, शिक्षकांचे स्थानिक राजकारणाशी असलेले नाते यामुळे सरकारी शाळांचा दर्जा घसरला आहे. काही शिक्षक वर्षानुवर्षे एकाच शाळेत कार्यरत असून त्यांनी मराठी शाळा बुडविण्यास हातभार लावल्याचे आरोप पालक व ग्रामस्थ करत आहेत.

प्रारंभी ३५ शिक्षक निलंबित करण्यात आले असून आणखी ५० ते ६० जणांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहे. तपासणीअंती निर्णय होईल, असे शिक्षण विभागातून स्पष्ट करण्यात आले आहे.