Special Gram Sabha to implement ‘Sparsha’ campaign : गावोगावी जाऊन प्रशासन देणार माहिती; जिल्हा परिषदेचा उपक्रम
Akola स्पर्श कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मोहिमेबाबत गावोगाव जनजागृती करण्यासाठी दि. 26 जानेवारी रोजी आयोजित ग्रामसभेत माहिती देण्यात येईल. हा उपक्रम राबविण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे, हे विशेष.
या मोहिमेत दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीदरम्यान आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ZP CEO बी. वैष्णवी यांनी दिले. मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी सीईओंच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, ग्रामविकास, तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती वैष्णवी म्हणाल्या, ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येणार आहे. दि. 26 जानेवारी रोजी ग्रामसभेद्वारे जनजागृती, जिल्हाधिकाऱ्यांच्या संदेशाचे आवाहन, कुष्ठरोग निर्मूलनाची प्रतिज्ञा आदी कार्यक्रम होतील. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये, कार्यालये, शाळा, महाविद्यालयात प्रतिज्ञा घेतली जाईल.’
जनजागृतीसाठी शाळांमध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी, चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम घ्यावेत. लवकर निदान व लवकर उपचाराचे महत्त्व याबाबत समाजात शास्त्रीय माहितीचा प्रसार करावा. ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे घेऊन गरजूंना उपचार मिळवून द्यावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हास्तरीय खुलीमॅराथॉन देखील जनजागृतीसाठी आयोजित करण्यात येणार आहे. त्यात अधिकाधिक नागरिकांचा सहभाग मिळविण्यासाठी प्रसिद्धी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
Nagpur Police CM Devendra Fadnavis : नागपूरचा ‘खुफिया’ विभाग करतोय तिकीट विक्री !
अकोला जिल्ह्यात आजमितीला 130 कुष्ठरूग्णांवर उपचार सुरू आहेत. कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेद्वारे सातत्याने तपासण्या, उपचार आदी कार्यवाही होत आहे, अशी माहिती आरोग्य सेवा सहायक संचालक डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.