uddhav-thackeray-mla-siddharth-kharat-prepares-for-zp-election : आमदार सिद्धार्थ खरातांची ‘हिवरा’ पट्ट्यात मोर्चेबांधणी; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात प्रयत्न
Mehkar आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहकर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हणजेच उद्धवसेना आक्रमक भूमिकेत दिसू लागली आहे. होळीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्थानिक सभागृहासाठी १५ लाख रुपयांची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
निवडणुकीस अद्याप अवधी असला, तरी उद्धवसेनेने आतापासूनच मेहकर तालुक्यातील काही भागांत आपली पकड मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत. विशेषतः हिवराखुर्द आणि परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा अलीकडेच उद्धवसेनेत झालेला प्रवेश हा या रणनीतीचा भाग मानला जात आहे. या घडामोडीत आ. खरात यांची भूमिका निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Sanjay Gaikwad : चिखलीत संपर्क मोहीम, गायकवाड पिता-पुत्र मैदानात!
या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेही संबंधित भागात सक्रिय हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे. कार्यकर्त्यांची बैठक, स्थानिक संपर्क आणि संघटनबांधणीच्या माध्यमातून काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होत असल्याचे संकेत आहेत.
विशेष म्हणजे, यापूर्वी काँग्रेसवर टीकेची झोड उठवणारी उद्धवसेना आता या पट्ट्यात शिवसेना (एकनाथ शिंदे गट)लाही लक्ष्य करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे मेहकर तालुक्यात तिरंगी राजकीय लढतीची शक्यता वर्तवली जात आहे.
Iran Israel War : सर्वोच्च नेत्याच्या निवडीच्या बैठकीवर इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला
एकूणच, निवडणूक जरी दूर असली तरी मेहकरातील सध्याच्या घडामोडी भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आगामी काळात पक्षांमधील हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.








