Breaking

ZP health department : Expiry ला आलेल्या औषधांचा पुरवठा, अधिकारी निलंबित

 

Officer suspended for supplying medicines nearing expiry date : अनावश्यक औषधांचा पुरवठा केल्याचेही उघडकीस

Wardha एक्स्पायरी डेट जवळ आलेल्या औषधांचा पुरवठा करणे, अनावश्यक औषधांचा व साहित्याचा पुरठवा करणे तसेच Operation साठी आवश्यक साहित्याचा पुरवठा प्राधान्याने न करणे आदी प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधी भांडारमध्ये कार्यरत असलेले औषधी निर्माण अधिकारी सोज्वळ उघडे यांनी गेल्या वर्षभरात औषधी पुरवठ्यासह इतर कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे चौकशीदरम्यान उघडकीस आले आहे.

अत्यावश्यक औषधीच्या यादीतील औषधींचा प्राधान्याने पुरवठा न करणे. मागणी नसताना अनावश्यक औषधी/साहित्याचा पुरवठा करणे. पुरविलेल्या औषधीची कालबाह्य मुदत पाच ते सहा महिन्यांच्या आतील असणे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्वतंत्र ऑनलाइन लॉगिन उपलब्ध करून न देता स्वतः वापर करणे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधीचा पुरवठा करताना उपलब्ध करून दिलेले वाहन न वापरणे. ओटीकरिता आवश्यक साहित्याचा पुरवठा प्राधान्याने न करणे आदी बाबी समोर आल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Local Body Elections : प्रशासन लागलं निवडणुकांच्या तयारीला

त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी त्यांना निलंबित करण्याचा आदेश काढल्याने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. आरोग्य विभागाच्या औषधी भांडारात अनागोंदी कारभार सुरू असल्याची कुणकुण लागताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी वर्ध्यातील दोन्ही औषधी भांडारला अचानक भेट देऊन ते सील केले होते. तेव्हापासूनच या भांडारातील चौकशीला सुरुवात झाली.

Vidarbha Farmers : कृषी केंद्रांचे गौडबंगाल उघडकीस!

यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १८ फेब्रुवारीला औषधी निर्माण अधिकारी उघडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास कळविले होते. या खुलाशातही ठोस कारण स्पष्ट केले नसल्याने अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३चा भंग केल्याचे दिसून येत असल्याने तत्काळ निलंबित करण्यात आले. तसेच निलंबन काळात उघडे यांना सिंदी (रेल्वे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले आहे.